लाचखोर माळशिरस नगरपंचायत कर निर्धारण अधिकारी विकास पवार यांना पोलीस कस्टडी…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस नगर पंचायतीचे कर निर्धारण अधिकारी श्री. विकास गोरख पवार (वय ३८), दीड हजार रुपये लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकलेले होते. माळशिरस न्यायालयात हजर केले असता पुढील तपास कामी अँटी करप्शन अधिकारी यांनी पोलीस कस्टडीची मागणी केलेली होती. मे. न्यायाधीश यांनी १८ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.
माळशिरस नगरपंचायत हद्दीतील बिनशेती जागेची नोंद घेऊन त्यांना मालमत्ता उतारा देण्यासाठी श्री. विकास गोरख पवार कर निर्धारण अधिकारी, माळशिरस नगरपंचायत माळशिरस, यांनी शासकीय फी व घरपट्टी व्यतिरिक्त दीड हजार रुपयांची मागणी करून सदरची रक्कम त्यांच्या कार्यालयात स्वीकारल्यावरून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ प्रमाणे माळशिरस पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग पुणे श्री. शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून पथकाचे प्रमुख लाच लुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री. गणेश कुंभार, यांच्या पथकाने कारवाई केलेली होती.
त्यामध्ये पोलीस अंमलदार, सहाय्यक पोलीस फौजदार कोळी, पोलीस हवालदार सोनवणे, पोलीस हवालदार घुगे, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड यांच्या पथकाने ही कार्यवाही केलेली होती. रात्री उशिरापर्यंत कार्यवाहीचे कामकाज सुरू होते. आज न्यायालयात हजर केले असता पोलीस कस्टडी मिळालेली आहे. त्यामुळे अजून काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. माळशिरस नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी अलर्ट झालेले आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Sugar defender reviews : sugar defender reviews
Usually I do not read article on blogs however I would like to say that this writeup very compelled me to take a look at and do so Your writing taste has been amazed me Thanks quite nice post
Blue Techker I am truly thankful to the owner of this web site who has shared this fantastic piece of writing at at this place.
Blue Techker naturally like your web site however you need to take a look at the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I find it very bothersome to tell the truth on the other hand I will surely come again again.
8pctbr
Thinker Pedia This was beautiful Admin. Thank you for your reflections.