ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस विधानसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्याची आजपासून (दि.२२) सुरुवात

अकलूज (बारामती झटका)

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून २५४- माळशिरस (अ.जा.) विधानसभा मतदार संघ निवडणूककामी दि‌. २२ ते २९ आक्टोंबर या कालावधीत सकाळी ११.०० ते दुपारी ०३.०० वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी २५४- माळशिरस (अ.जा.) विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, माळशिरस विभाग अकलूज, सुजयनगर – १, अकलूज यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार नाही.

नामनिर्देशन दाखल करताना उमेदवाराने किंवा त्यांचे एका प्रस्तावकाने स्वतः उपस्थित राहून नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे आहे. एका उमेदवारास एका विधानसभा मतदार संघात जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्र दाखल करताना कार्यालयापासून १०० मीटर अंतरामध्ये वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवाराला तीन पेक्षा जास्त वाहनांचा समावेश करता येणार नाही. यासाठी या कार्यालयाकडून वाहनांना वाहतुक परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवारासोबत केवळ चार व्यक्तींना उपस्थित राहता येईल. उमेदवाराने नामनिर्देशन दाखल करताना फॉर्म २६ मधील शपथपत्र दाखल करणे आवश्यक आहे.

सदरचे शपथपत्र हे न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग किंवा नोटरी पब्लीक किंवा मा. उच्च न्यायालयाने शपथपत्र करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या शपथ आयुक्त यांच्यासमोर केलेल्या असणे बंधनकारक आहे. तसेच शपथपत्राच्या प्रत्येक पानावर उमेदवाराची स्वाक्षरी व नोटरीचा शिक्का असणे बंधनकारक आहे. सदरचे शपथपत्र हे ५०० रु‌. स्टॅम्पवर द्यावयाचे आहे. नामनिर्देशन दाखल करताना उमेदवाराने ठरवून दिलेल्या २ से.मी.X२.५ से.मी. आकाराचे अलीकडील काळातील मा. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषाप्रमाणे असलेले छायाचित्र चिटकवावे. नामनिर्देशन पत्रासोबत अनामत रक्कम रुपये ५०००/- भरावयाची आहे. निवडणूकीसाठी उमेदवारास स्वतंत्र बॅंक खाते उघडणे आवश्यक आहे, असे विजया पांगारकर, निवडणूक २५४ – माळशिरस (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

7 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button