विनायक शिंदे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस मधील विनायक संभाजी शिंदे यांना युवा महाराष्ट्र फाउंडेशन चा महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह शिवाजीनगर, पुणे येथे प्रसिद्ध सिनेअभिनेत्री निधी तापडिया, कृष्ण प्रकाश गोयल व तृप्ती देसाई यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. विनायक शिंदे यांनी स्पर्धा विश्व अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, माळशिरस यामार्फत माळशिरस तालुक्यात प्रथमच पुण्यानंतर स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मुलांसाठी अभ्यासिकेची निर्मिती केली. त्यांनी या स्पर्धा विश्व टीम मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवत स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण करणे, नेत्र तपासणी शिबिर, विशेषत: कोरोना काळात त्यांनी शिखर शिंगणापूर येथील माकडांना खाद्यपदार्थाचे वाटप केले.
स्पर्धा विश्व अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र मार्फत गरीब अनाथ मुलांना, माजी सैनिकांना मोफत अभ्यासिकेची सोय उपलब्ध करून दिली. स्पर्धा परीक्षेचे वातावरण निर्मिती केली. मुख्य परीक्षेला पुण्याकडे जाण्यासाठी असणारी मुलांची ओढ लक्षात घेऊन राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होणाऱ्यांना अभ्यासिका मोफत सुविधा उपलब्ध करून दिली. गट ब परीक्षेत पास होण्याऱ्या फीमध्ये 50% सवलत अशी सुविधा उपलब्ध करून देणारी महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा विश्व अभ्यासिकामार्फत त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नावर तक्रारी करून प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच माहिती अधिकाराचा वापर करून अनेक गैर प्रकार उघड केले आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र गौरव या पुरस्कारासाठी निवड केली. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या मित्रपरिवारामधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.