ताज्या बातम्याराजकारण

महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या गाव भेटीने प्रचारास सुरुवात..

“उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमचं आणि मतदारांचं ठरलंय”, वाक्याने भाजपच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले…

माळशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा 254 अनुसूचित जाती मतदार संघात महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शन करीत दाखल केल्यानंतर “आमचं आणि मतदारांचं ठरलंय”, या वाक्याने महायुतीच्या सर्व घटक पक्ष व भाजपच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झालेले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांनी मतदार संघात प्रचाराची सुरुवात गाव भेटीने धर्मपुरी गावापासून सुरू करणार आहेत. आजच्या दौऱ्यामध्ये धर्मपुरी, गुरसाळे, मोरोची, कारूंडे, कोथळे, पिंपरी, फरतडी, निटवेवाडी, लोंढे मोहितेवाडी, लोणंद, गिरवी, मांडवे, देशमुखवाडी, पुरंदावडे असा गाव भेट दौरा नियोजित केलेला आहे.

महायुतीचे अधिकृत उमेदवारी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना जाहीर झाल्यानंतर माळशिरस तालुक्यात धर्मपुरी या ठिकाणी महायुतीच्या सर्वच घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केलेले होते. दुसऱ्या दिवशी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. त्यानंतर प्रसार माध्यम व मतदारांशी संवाद साधताना त्यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघांमध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. गतवेळच्या निवडणुकीत आपण सर्वांनी मतदान करून या तालुक्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिलेली होती.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघामध्ये विकासकामे केलेली आहेत. अडीच वर्षांमध्ये सरकार भाजपच्या विचाराचे नसल्याने अडचणी होत्या‌. त्यानंतर महायुतीचे सरकार आल्यानंतर मतदार संघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जनतेची सेवा केलेली आहे. विकासकामे व व्यक्तिगत कामे करीत असताना कोणत्याही व्यक्तीला जात, धर्म, पंथ, पक्ष विचारलेला नाही, अडचणीत असलेल्या माणसाचे काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. मतदारांनी सेवा करण्याची संधी दिलेली आहे‌. याही निवडणुकीत मतदारांनी सेवा करण्याची संधी द्यावी, अशी भावनिक साद घातल्यानंतर मतदारांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिलेला होता.

आमदार राम सातपुते यांनी “आमचं आणि मतदारांचं ठरलंय”, या वाक्यावर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले आहे. आजपासून गाव भेटीने प्रत्यक्ष प्रचारास सुरुवात केलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button