पारंपारिक लावणी प्रशिक्षिका सरलाबाई नांदुरेकर यांचे निधन.
संग्रामनगर (बारामती झटका अकलूज)
अकलूज ता. माळशिरस, येथील पारंपारिक लावणी प्रशिक्षिका सरलाबाई नांदुरेकर यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक सून, एक नातू असा परिवार आहे.
सरलाबाई नांदुरेकर यांनी अकलूज लावणी स्पर्धेतील अनेक कलाकार घडविले होते. त्यांनी प्रशिक्षण दिलेले कलाकार आज राज्यस्तरीय तसेच टीव्ही मालिका, चित्रपटातून झळकत आहेत. कला क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कला मंत्रालयातर्फे त्यांना एक लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
त्याच बरोबर त्यांना अकलूज लावणी स्पर्धेचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील लावणी कलावंत पुरस्कार तसेच पठ्ठे बापूराव पुरस्कार आदी पुरस्कार प्राप्त झाले होते.
त्यांच्या निधनाने लावणी कला क्षेत्रात दुखवटा पसरला असून त्यांच्या अंत्ययात्रेस अनेक लावणी कलावंत उपस्थित होते. अकलूज लावणी स्पर्धेचे जनक जयसिंह मोहिते पाटील यांनी सरलाबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Lato99 Lato99