माण-खटाव मतदारसंघात आदिवासी कोळी महादेव जमातीचे मतदान ठरणार निर्णायक – आण्णासाहेब कोळी, राज्य सदस्य कोळी महासंघ
म्हसवड (बारामती झटका)
माण-खटाव तालुक्यातील मतदार संघात महायुती व महाविकास आघाडीमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी सुरू झालेली काटे की टक्कर लक्षात घेता राज्यातील महायुतीचे व महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते या मतदारसंघाकडे विशेष लक्ष देत आहेत. व मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या गेल्या अनेक वर्षापासून निवडणूकीमध्ये निर्णायक भूमिका बजावणारे कोळी महादेव जमात यांना महायुती व महाविकास आघाडीने आदिवासी कोळी महादेव जमातीचे प्रश्न अद्यापही प्रलंबित ठेवले आहेत. माण-खटाव तालुक्यासह व सातारा जिल्ह्यातील इतर तालुक्यात मतदारसंघांमध्ये सध्या आदिवासी कोळी महादेव जमातीचे नाराजीच सत्र सुरू आहे.
माण-खटाव मतदारसंघांमध्ये आदिवासी कोळी समाज संख्येने जरी कमी असला तरी उमेदवारांना निवडणूकीत विजयासाठी लागणारे ठोस मतदान निर्णायक ठरणार आहे, हे तितकेच महत्त्वाचे आहे. आदिवासी कोळी महादेव जमातीने दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रामाणिकपणे एक निष्ठेने काम करीत लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका सातारा जिल्ह्यात मतदारसंघात बजावली.
माण-खटाव विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीचे नेते मतदारसंघांमध्ये सूक्ष्म नियोजन करीत कोठे कमी पडणार नाहीत, याची दक्षता घेत आहेत. परंतु, या विधानसभा मतदारसंघात आदिवासी कोळी महादेव जमात यांची भूमिका निर्णायक ठरणार व आम्ही ठरवेल तोच आमदार या मतदारसंघातून निवडून जाणार असल्याचे कोळी महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा माढा लोकसभा अध्यक्ष आण्णासाहेब कोळी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Ezippi I just like the helpful information you provide in your articles