ताज्या बातम्या
वेळेबरोबर चमच्यांची ही दुरावस्था दिसून येऊ लागली…

(बारामती झटका)
पुर्वीच्या काळापासून चमच्यांना नाष्ट्यामध्ये व जेवणात अनन्य साधारण महत्व आहे. वेळेबरोबर चमच्यांनी ही आपले स्वरूप बदलायला सुरुवात केली आहे. फार वर्षापुर्वी जेवणाच्या ताटात सुंदर व आकर्षक स्टीलचा चमचा आला. तो महाग असल्यामुळे लोक तो चमचा घासून, धुऊन, पुसून परत वापरत होते.

त्यानंतर त्या चमच्यांची जागा प्लॅस्टिकच्या चमच्याने घेतली. त्यानेही काही काळ गाजवला आहे पण, आता तर जेवणाच्या ताटात बांबूच्या चमच्यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे जेवण झाले की तो चमचा डायरेक्ट डस्टबीनच्या (कच-याच्या) डब्यात दिसू लागले आहेत. त्यामुळे चमच्यांची झालेली अशी दुरवस्था लोकांना पहावत नाही आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.