शेतकरी राजा…तण खाई धन ! रब्बी हंगाम एकात्मिक तण नियंत्रण – सेवारत्न सतिश कचरे मंडळ कृषि अधिकारी
अकलूज (बारामती झटका)
पावसाळा हंगाम जवळपास संपला आहे. सर्वदूर काही अपवादात्मक मंडळ वगळता सर्वत्र समाधानकारक पाऊस पडला आहे. रब्बी हंगाम शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग चालू आहे. प्रत्येक शेतकऱ्याला रब्बी हंगामात सतत सतावणारा प्रश्न म्हणजे त्याने पेरलेल्या मुख्य पिकाबरोबर स्पर्धा करणाऱ्या तणाचा बंदोबस्त कसा करायचा ?
तण हे सर्वत्र उगवणारी आणि निसर्गाच्या व्यवस्थेनुसार वाढणारी व पसरणारी वनस्पती असून पिकापेक्षा अधिक काटक, कणखर, वेगाणे वाढणारी, कोणत्याही हवामान तग धरणारी, अनेक वर्षे पुर्नजीवीत होणारी ही वनस्पती आहे. वार्षिक तणामध्ये रबी हंगामात चंदन, बटवा, राणएरंडी द्विवार्षीक तणात जंगली गाजर, बहुवार्षिक तणामध्ये हरळी, घणेरी लव्हाळा, लांब पानाची तणे, शीप्पी, लोणा, रुद, पाणाची तणे, दिपमाळा, कुजरु, दूधी इत्यादी तणामुळे पीक व तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी लागवडी नंतर ज्वारी व सुर्यफुल – १५ ते ४५ दिवस हरभरा – १५ त ३० दिवस, मका – २० ते ४५ दिवस, ऊस – २० ते १२० दिवस या मध्ये तणाचा बंदोबस्त नाही केला तर रब्बी ज्वारी चे ४० ते ५०% , मका चे ४० ते ४५%, गव्हू चे ३० ते ३४% , ऊस पिकाचे ५५% ते ६०%, सूर्यफुल चे ३० ते ३३%, हरभरा चे २५% ते ४१% उत्पादनात घट होते. तणाचे निर्मूलन करण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे बी येण्यापूर्वी तणांचा नायनाट करणे हा होय. तणांच्या प्रभावी नियंत्रणासाठी अत्यंत वाजवी खर्चाचा पिकाशी मैत्रीचा नगन्य उर्वरीत अंश राहणारा परिणामकारक मार्ग म्हणजे मशागत थांबविणे व रासायनिक तणनाशकाचा वापर करणे हा आहे.
काही प्रमुख पिके व तणनाशके त्याचे प्रमाण व वापराचा कालावधी खालील प्रमाणे – १ ) रब्बी ज्वारी – ॲट्राझीन ५० % wp- पेरणीनंतर उगवन अगोदर ४८ तासात १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी मध्ये ज्वारी उगवन नंतर २-४ -D ८० w p द्विदल तणासठी १२ .५ ग्रॅम ते २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणीमध्ये फवारणी करावी. २ ) मका पिक – अँट्राझीन ५० % w p पेरणीनंतर ४८ तासात २० ते २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये /२ ‘४ -D ५० wp मका उगवननंतर द्विदल तणासाठी १२.५ ग्रैम ते २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून टॅम्बो ट्राईन ३४.४% उगवन नतंर एकदल व द्विदल तणांसाठी ५ .८ मिली प्रति १० लिटर पाण्यातून टोप्रोमेझॉन उगवन नंतर २ ते ३ मिली १० लिटर पाण्यामधून फवारणी करावी ३ ) गहू पिक – पेंडीमिथिलीन ५० EC पेरणीनंतर ४८ तासात ३३ ते ४४ मिली १० लिटर पाण्यातून मेटासल्फ्युरॉन मिथाईल २०wp पीक उंगवननतर २० ग्रॅम पूर्ण मात्रा ३०० लिटर पाणी स्टॉक शुल्यूशन पाण्यात मिसळून फवारणी करावी. ४) हरभरा पीक – पेंडामिथीलीन ३०EC पेरणीनंतर ४८ तासात ३३ ते ४४ मिलि प्रति १० लिटर पाण्यातून क्यूझॉल क्रॉपइथाईल ५EC पीक उगवननंतर १६ मिलि १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. ५ ) सुर्यफुल पीक – पेंडामीथीलीन ३०EC पीक उगवन पूर्व पेरणीनंतर ४८ तासात ३३ ते ४४ मिलि १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. ६)ऊस पीक – अँट्राझीन ५० % w पेरणीनंतर ४८ तासात १५ ते ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून मेट्रीब्युझीन ७० wp पीक उगवन नंतर १४ ते २० ग्रॅम १० लिटर पाण्यातून २’४ – D ८०% पीक उगवन नंतर ग्रॅम प्रति १०लिटर पाण्यातून हैलोसफ्युरॉन मिथाईल ७५ w लव्हाळा व सम तणासाठी २ ते ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
वार्षिक तणासाठी पॅराक्वॉट ०.४ प्रति हेक्टर फवारणी करावी. पीकनिहाय वेळ निहाय मात्रा निहाय शिफारशीचा वापर करावा व स्वच्छ पाणी व पाण्याच्या ७.५ सामू मध्ये मिश्रण करून सेपरेट तणनाशक पंपाद्वारे पूर्णतः विरघळवून वापरावेळी वेळोवेळी ढवळून प्लॅट कोन हुडच्या नोझलचा वापर करून धुके, पाऊस नसताना फवारणी करावी. तण नाशके फवारताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. यामुळे तणनियंत्रण समाधानकारक रित्या होते. स्प्रे मारत असताना तंबाखू, पान, सिगारेट यांचे सेवन न करता फवारणी किटचा वापर करून फवारणी करावी.
शेतकरी बंधूनी उत्पादन खर्च कमी करून आधिक उत्पादनासाठी वेळेवर तणाचा बंदोबस्त करून किड व रोग तण नियंत्रणाद्वारे करणे काळाची गरज आहे. शेतकरी बाधवांनी पिकाच्या संवेदनशील वेळेच्या अगोदर शिफारसीनुसार पाणी व तणनाशके मात्रा वापरून तण नियंत्रण करणेचे व आधिक माहितीसाठी कृषि विभाग ग्रामस्तर अधिकारी यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन मंडळ कृषि अधिकारी अकलुज कार्यालयाने केले आहे
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.