अनुसूचित जाती व जमातीसाठी कृषी विभाग योजना भरीव तरतूद व अनुदान.
अकलूज (बारामती झटका)
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर ५७.५२ लाख व राज्यस्तरावर २०.८३ कोटी एवढी तरतूद उपलब्ध आहे. या प्रवर्गातील शेतकरी यांना त्यांचे शेतीसाठी आवश्यक असलेल्या ३० एचपीपर्यंत टॅक्टर, टॅक्टर ऑपरेटेड ब्लोअर, टॅक्टर माऊटेड ब्लोअर, पॅक हाऊस, कांदा चाळ, शेततळे अस्तरीकरण, सोलर ट्रॅप, मल्चिंग पेपर, द्राक्ष व डाळींब ॲन्टोहेलनेट कव्हर, फळबाग पूर्नरज्जीवन इत्यादी योजनासाठी लाभ घेणेसाठी https//:agridbtworkflowmahaonline.gov.in या संकेत स्थळावर जाऊन योजना बाबत आवश्यकता, निवड, गरजेनुसार जात प्रमाणपत्रासह व उत्पन्न दाखला सह ऑनलाईन अर्ज भरणेसाठी CSC सेन्टर आपले सरकार केंद्र किंवा मोबाईन ॲपवर अर्ज करून लाभ घ्यावा.
अधिक माहिती मार्गदर्शन सल्लासाठी ग्रामस्तरावरील कृषि सहाय्यक किंवा नजीकचे कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन मंडळ कृषि अधिकारी अकलुज सेवारत्न सतीश कचरे यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
“Thanks for sharing such valuable information!”