माळशिरसमध्ये राहून संघर्ष करून जनतेच्या सेवेच्या आशीर्वादावर तालुक्यात पुन्हा कमळ फुलविण्यासाठी प्रयत्नशील – सौ. संस्कृती राम सातपुते.
मांडवे (बारामती झटका)
माळशिरस विधानसभा मतदारसंघांमध्ये राहून वेळप्रसंगी संघर्ष करून जनतेच्या सेवेच्या आशीर्वादावर तालुक्यात पुन्हा कमळ फुलवण्यासाठी लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा जोमाने प्रयत्नशील राहणार असल्याचे मत आमदारपत्नी सौ. संस्कृती राम सातपुते यांनी बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी संवाद साधताना सांगितले.
माळशिरस विधानसभा 254 मतदार संघामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक ताकतीने लढून मोहिते पाटील व जानकर गट एकत्र येऊन दमदाटी व दबावाचे राजकारण करून सुद्धा एक लाख आठ हजारापेक्षा जास्त मतदान सर्वसामान्य व गोरगरीब जनतेने दिलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यामध्ये गेल्या 70 वर्षापासून वंचित असणाऱ्या भागांचा विकास करून जनतेच्या मनामध्ये घर केलेले आमदार राम सातपुते यांना निवडणुकीत मतदारांनी चांगल्या पद्धतीने गनिमी काव्याने सहकार्य केलेले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चांगला फायदा झाला. तालुक्यामधील महिलांशी सुसंवाद साधून हळदीकुंकू व इतर कार्यक्रमांमधून महिलांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचीच पोचपावती महिलांनी मतदानाच्या रूपाने दिलेली आहे. देशात व राज्यात महायुतीचे सरकार आहे. निश्चितपणे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या व्यक्तिगत व सार्वजनिक अडचणी सोडविण्यासाठी आमचा सातपुते परिवार कायम जनतेच्या पाठीशी राहणार आहे.
तालुक्यातील दडपशाही व दहशतीला न घाबरता माळशिरस तालुक्यामध्येच संघर्षमय जीवन जगून सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादावर माळशिरस तालुक्यात पुन्हा कमळ फुलवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे संस्कृतीताई सातपुते यांनी सांगितले. निवडणुकीच्या निकालानंतर मतदार संघातील पिलीव येथील गोंजारी परिवारातील विवाह समारंभानिमित्त वधू-वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी त्या उपस्थित होत्या. श्रीराम बंगला मांडवे येथील निवासस्थानी बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी औपचारिक चर्चा करीत असताना त्यांनी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.