ताज्या बातम्याराजकारण

रणजीतसिंह नाईक निंबाळकर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात मोलाची कामगिरी करणार – केंद्रीय मंत्री ना. अमित शहा

फलटण (बारामती झटका)

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात यश संपादन करता आले आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सातारा जिल्ह्यात आठही उमेदवार विजयी झाले. यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मोलाचा वाटा आहे.

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे उमेदवार श्री. सचिन सुधाकर पाटील यांना विजयी करण्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले तरीसुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजप आणि महायुतीच्या मित्र पक्षांना सोबत घेऊन प्रचाराची धुरा स्वतः सांभाळली. आणि मागील २९ वर्ष सत्तेत असणाऱ्या राजे गटाला पराभवाचा धक्का दिला.

या कार्याची दखल घेऊन भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे असे म्हणत, रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना महाराष्ट्राच्या राजकारणात सदैव सक्रीय राहण्याचे संकेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. यामुळे फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विकासाच्या अनुषंगाने सक्रिय राहण्यास रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या अनुषंगाने फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास नक्कीच उत्तम रीतीने होईल, असा आत्मविश्वास सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

  1. I’m reallly inspired along with our writing abilities aas neatly aas
    with thhe format for youur weblog. Is tyat this a paid tpic oor didd you customize iit yourself?

    Either way keepp up thee nice quaslity writing, it’s rare too peewr
    a nife blog like this one these days..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button