क्रीडाताज्या बातम्यासामाजिक

टेंभुर्णी येथील गोविंद वृध्दाश्रम येथे शहीद दिवस विविध कार्यक्रमाने साजरा

अकलूज (बारामती झटका)

टेंभुर्णी (ता.माढा) येथील सद्गुरू बहुउद्देशीय संस्था संचलित गोविंद वृध्दाश्रम टेंभुर्णी व ‘ए’ ग्रुप बाभुळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीदांच्या स्मरणार्थ वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान पोलीसातील देवमाणूस, गुणवंत विद्यार्थी, महिला कुस्तीपटू, खेळाडू, समाजसेवक, दानशूर व्यक्ती व गुणवंत डॉक्टर यांच्या गुणगौरव व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शहिद दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकूण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून पुण्यकर्म केले आहे.

सदर कार्यक्रमाची सुरुवात आश्रमातील बालकांनी टाळ मृदूंगाच्या गजरात सुंदर अशा भजनाने केली. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत माजी सैनिक कैलास गवळी, डॉ. लक्ष्मण आसबे, कवयित्री नूरजहाँ शेख, नॅशनल खेळाडू, वीरपत्नी यांच्या शुभहस्ते शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी नॅशनल सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू कु. शिवानी प्रकाश कर्चे, नॅशनल रौप्यपदक विजेती कुस्तीपटू कु. अनुष्का दत्तात्रय यादव, पैलवान कु. ज्ञानेश्वरी शिंदे ३६ किलो वजन गटात रौप्यपदक विजेती पै. कु. गायत्री शिंदे ३९ किलोमध्ये कास्यपदक विजेती या नॅशनल खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी वीरपत्नी सुवर्णाताई डोईफोडे, सुरेखाताई जाधव, पुनम गिरीमकर तसेच गणेशगांव येथील कवयित्री नूरजहाँ शेख यांना काव्यसम्राज्ञी पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी सचिन पराडे पाटील, भूषणभैया पराडे पाटील, जयेश पाटील, शंकर अण्णा, विकी अण्णा आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भागवत रावसाहेब पराडे पाटील, ‘ए’ ग्रुप बाभुळगाव यांच्या वतीने करण्यात आले होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button