फलटण येथे श्री. अमीर शेख यांच्या राहत्या घरी घुसून युवकांची मारहाण व लुटमार
फलटण (बारामती झटका)
रविवार दि. ०१/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ७.३० च्या दरम्यान फलटण येथील लक्ष्मी नगर भागात एकता गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मिनी साउंड स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या वेळी युवकांच्या किरकोळ वादातून १५ ते २० जणांनी लाथा बुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने व लोखंडी फायटरने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच शेख यांच्या राहत्या घराच्या व दुकानाच्या काचा फोडून लूटमार केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदणी क्रमांक 604/2024 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बी .एन .एस. कलम 310(2),109,118(1),115(2),189(2)191(2)191(3),109,324(4)(5),352,351,(2)(3) नुसार पोलीस प्रशासनाने कारवाई केली आहे.
सदर गुन्हा बारव बाग, लक्ष्मी नगर, आणि फिर्यादी अरबाज आमिर शेख वय २४ वर्षे, व्यवसाय हॉटेल, रा. बारवबाग, लक्ष्मी नगर, फलटण येथे घडला असून पोलीस प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे.
या गुन्ह्याची थोडक्यात हकीगत अशी आहे की, दि. ०१/१२/२०२४ रोजी रात्री ७ च्या दरम्यान एकता गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मिनी साऊंड स्पर्धेच्या वेळी यश श्रीवास्तव आणि हर्ष रोहिदास नलवडे, फिर्यादी अरबाज शेख यांच्याशी वाद झाला आणि या स्पर्धेच्या पुढच्या राऊंडला आम्हाला पाठवा किंवा ओंकार गुजर याचा साऊंड स्पर्धेतून बाद करा, असे म्हणून हर्ष रोहिदास नलावडे, नोहेल तांदळे, विशाल कुराडे, संकेत गणेश कापसे, संकेत अलगुडे यांनी फिर्यादी अरबाज शेख यांना शिवीगाळ केली व हर्ष नलवडे यांनी त्याच्या हातातील पेपर स्प्रे फिर्यादी अरबाज शेख, आबा शेख, विशाल ठोंबरे यांच्या तोंडावर मारला. आणि फिर्यादी अरबाज शेख यास हाताने, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
तेथून हे सर्वजण फिर्यादी अरबाज शेख राहत असलेल्या घरासमोरील वॉरंट्यामध्ये आले व दरवाजावर दगड मारून खिडक्यांच्या काचा फोडून थोड्या वेळाने फिर्यादीच्या घरासमोर पाच ते सहा मोटरसायकल वरून पंधरा-सोळा मुले आली. त्याचवेळी अरबाज शेख यांच्या शेजारी राहणारा आशिष जाधव यांनी फिर्यादी अरबाज यांचे वडील अमीर शेख त्यांचे मित्र राजभाऊ देशमुख, देशमाने तेथे येऊन भांडण सोडवण्यात आले.
यावेळी आकाश माने, हर्ष रोहिदास नलवडे, नोहेल तांदळे, विशाल कुराडे, संकेत गणेश कापसे, संकेत अलगुडे यांनी व अनोळखी पंधरा-सोळा युवकांनी लोखंडी फायटरने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आकाश माने यांनी त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादी अरबाज शेख यांचे वडील आमिर शेख यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला पण आमिर शेख यांनी तो उलटवला. या झटापटीत अमीर शेख यांनी पाच सहा वर्षांपूर्वी केलेले दोन तोळ्याचे सोन्याचे कडे हिसकावून काढून घेऊन गेले. तसेच आशिष जाधव याच्या डोक्यावरती फायटरने मारहाण करून खाली पाडून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन 15 ग्रॅम व त्याच्या खिशातील पैशाचे पाकीट काढून घेऊन गेले.
फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी अरबाज शेख यांनी फिर्याद दाखल केली असून गुन्ह्याचा तपास शहर पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे करत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.