रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गटा) च्या सोलापूर जिल्हा व शहर च्या निवडी जाहीर माळशिरस तालुका अध्यक्षपदी रमेश दादा साळवे यांची निवड
सोलापूर (बारामती झटका)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने पक्ष वाढीसाठी बैठक समृद्धी हॉल, सोलापूर येथे संपन्न झाली. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जकाप्पा कांबळे होते. याप्रसंगी नूतन महाराष्ट्र अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्रीकांत नानासाहेब सावंत, उपाध्यक्ष दत्ता सावंत, सोलापूर जिल्हा अध्यक्ष धर्मा माने ,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रावसाहेब प्रक्षाळे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजू लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी अल्पसंख्यांकचे सर्व पदाधिकारी व रिपाईच्या सर्व महिला पदाधिकारी याची निवड करण्यात आली आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष वैभव( भैया) धाईंजे यांची निवड करण्यात आली. तर माळशिरस तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) तालुकाध्यक्षपदी रमेश (दादा) साळवे यांची निवड करण्यात आली. तसेच महादेव समिंदर यांची माळशिरस तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच महिला पदाधिकाऱ्यांची व अल्पसंख्यांक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. त्यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गटाच्या) माळशिरस तालुकाध्यक्ष पदी रमेश दादा साळवे यांची निवड करण्यात आली. यापूर्वी रमेश दादा साळवे यांनी जिल्हा महासचिव पदी काम केले असून ते “लोकनेता न्यूज चॅनलचे संपादक” आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड केल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.