ताज्या बातम्या

एचपी गॅस एजन्सीच्या सेफ्टी अवेअरनेस व कुकिंग कॉम्पीटीशनमध्ये रंगले निवेदक सुरेश साळुंकेंचे निवेदन.

बीड (बारामती झटका)

बीड जिल्ह्य ओएमसी एलपीजी वितरकाच्यावतीने महिला भगिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने सेफ्टी अवेअरनेस कॅम्प व कुकिंग कॉम्पिटिशनचे आयोजन केले होते. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन आदर्श निवृत शिक्षिका सुनंदा देशमुख-जळगावकर यांच्या हस्ते झाले. तर पाककला स्पर्धेत विजयी महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाशजी नाईकवाडे, गुरुकृपा एचपी गॅसचे संचालक संग्रामजी तिवारी, सुरज गॅस एजन्सीचे संचालक प्रसन्न मुळे, प्रदीप गॅस एजन्सीचे व्यवस्थापक श्री. मुळे यांच्या शुभहस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन सुप्रसिद्ध निवेदक सुरेश साळुंके यांनी केले.

दरम्यानच्या, काळामध्ये सहभागी झालेल्या महिला भगिनींशी गप्पागोष्टी करत उपस्थित असलेल्या महिलांबरोबर स्वयंपाक करताना येणाऱ्या समस्यांच्या बाबतीत अतिशय दिलखुलास चर्चा करून गमतीजमती घडवल्या व स्वयंपाक रूम मधील अनेक विनोदी बारीक-बारीक किस्से महिलांकडून वदवुन घेतले. त्यामुळे कार्यक्रमामध्ये एक वेगळीच रंगत आली. महिला भगिनींनी आपले अनुभव सांगताना अनेक समस्या सांगितल्या की, ज्या समस्याच नव्हत्या तर त्या केवळ माहीत नसल्यामुळे समस्या वाटत होत्या. या सर्व महिलांना बोलते करून त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकवण्याचे अवघड काम सुप्रसिद्ध निवेदन सुरेश साळुंके यांनी केले.

माईकवर कधीच न बोललेल्या महिलांना स्वयंपाक घरातील महाराष्ट्रीयन पद्धतीचे व इतर पौष्टिक पदार्थ कसे बनवायचे विचारून उपस्थित महिलांच्या ज्ञानामध्ये भर टाकली. तर सर्व आयुष्य चुलीवर स्वयंपाक करण्यात गेलेल्या सत्तर ते ऐंशीच्या वयस्कर महिलांना जुन्या काळातील पौष्टिक आहाराविषयी प्रश्न विचारून त्यांच्याकडून मिळालेली माहितीचे विश्लेषण करुन उपस्थित महिलांना सुरेश साळुंके यांनी सांगितले.

यावेळी निवेदक सुरेश साळुंके यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नाईकवाडे, श्री. गणेश यांच्या हस्ते संपन्न झाला. बीड जिल्ह्यातला हा आदर्श उपक्रम यशस्वी करण्यासाठी काळे सर, संग्राम तिवारीजी, सौ. राधा तिवारी सह एचपी गॅस एजन्सीची ग्राहकांना तत्पर सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button