लाडक्या बहिणींनी अफवांवर व रिल्सवर विश्वास ठेवू नये महिला व बालविकास विभाग अधिकारी प्रसाद मिरकले अधिकारी यांचे पत्र
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभाग अधिकारी प्रसाद मिरकले यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व, जिल्हा सोलापूर यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत पत्र दिले आहे.
सदर पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, या कार्यालयाचे असे निदर्शनास आलेले आहे की, मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडुन रील्स, व्हीडीओव्दारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असुन याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे.
या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्य स्थितीमधील कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडुन आपणांस कळविण्यात येईल. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये या करिता आपण आपलेस्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणुन दयावी, असे नमूद करण्यात आले आहे.
अशा अफवांवर व रिल्सवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभाग अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Amazing..!! We Wait Your New Post..!! Good Luck..!!
Rely on BWER Company for superior weighbridge solutions in Iraq, offering advanced designs, unmatched precision, and tailored services for diverse industrial applications.
Ищите в гугле