माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले..
भाजपचे निमंत्रित राज्य कार्यकारणी सदस्य व माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख गटाचा नगराध्यक्ष होणार….
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. ताई सचिन वावरे यांचा कार्यकाल संपत आलेला असल्याने नगराध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागलेले आहे. माळशिरस नगरपंचायतीचे नेते व नगराध्यक्ष यांची नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे, अशी अधिकृत माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य व माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख गटाचा नगराध्यक्ष होणार आहे.
माळशिरस नगरपंचायत निवडणुकीनंतर माजी नगराध्यक्ष डॉ. अप्पासाहेब देशमुख व माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य तुकारामभाऊ देशमुख दोन्ही गट एकत्र येऊन माळशिरस नगरपंचायतीची सत्ता स्थापना झालेली होती. त्यावेळेस नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख व उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख झालेले होते. त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख व उपनगराध्यक्षा सौ. पुनम अजिनाथ वळकुंदे झालेले होते. त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर नगराध्यक्षा सौ. ताई सचिन वावरे व उपनगराध्यक्षा सौ. कोमल वैभव जानकर झालेले होते. त्यांचा कार्यकाल संपत आलेला आहे.
माळशिरस नगरपंचायतीचे नेते व नगरसेवक यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाल्यानंतर उपनगराध्यक्षा सौ. कोमल वैभव जानकर यांनी नगराध्यक्षा सौ. ताई सचिन वावरे यांच्याकडे पदाचा राजीनामा दिलेला आहे. लवकरच नगराध्यक्षा सौ. ताई सचिन वावरे जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा सादर करून भाजपचे डॉ. आप्पासाहेब देशमुख गटाचे नूतन नगराध्यक्ष यांची निवड होईल.
केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार असल्याने माळशिरस नगरपंचायतीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही, त्यामुळे माळशिरसकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
BWER Company is committed to advancing Iraq’s industrial sector with premium weighbridge systems, tailored designs, and cutting-edge technology to meet the most demanding applications.
BWER Company provides Iraq’s leading-edge weighbridge solutions, designed to withstand harsh environments while delivering top-tier performance and accuracy.