फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आ. सचिनदादा कांबळे पाटील यांचे माळशिरस तालुक्यात बॅनर झळकले..
माळशिरस (बारामती झटका)
सातारा जिल्ह्यातील फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सचिनदादा कांबळे पाटील यांच्या विजयाचा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात नातेपुते येथील इंगोले परिवार यांनी दहिगाव रोड वरील इंगोले बिर्याणी हाऊस येथे हार्दिक अभिनंदनाचा बॅनर झळकवला आहे. सदरच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फोटोसह “हिंदू खाटीक समाजाचा ढाण्या वाघ आमदार झाला” असा फलक येणा-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
फलटण विधानसभा मतदार संघावर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची तीस वर्षाची सत्ता उलथवून माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सचिनदादा कांबळे पाटील यांना विधानसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच हिंदू खाटीक समाजाला प्रतिनिधित्व सचिनदादा कांबळे पाटील यांच्या रूपाने मिळालेले असल्याने हिंदू खाटीक समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. नातेपुते येथील इंगोले परिवार यांनी हार्दिक अभिनंदनाचा बॅनर कायम वर्दळ असणाऱ्या नातेपुते दहिगाव रस्त्यावर लावलेला असल्याने येणा-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.