कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांचा शिवप्रसाद उद्योग समूहाचे शरदबापू मोरे यांनी सन्मान केला…
नागपूर (बारामती झटका)
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे शपथविधी पार पडल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योजक शरदबापू मोरे यांनी नामदार जयाभाऊ गोरे यांचा नागपूर येथील विधानभवनात सन्मान केला.
महायुती मधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर घटक पक्षांमध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत सर्व पक्ष एकत्र येऊन काम केलेले होते.
लोकसभेच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्याची जबाबदारी नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे दिलेली होती. त्यावेळेस राष्ट्रवादीचे नेते शरदबापू मोरे यांच्याशी राजकीय जवळीक आलेली होती. माण-खटाव मतदार संघातील माण पंचायत समितीचे माजी सभापती अतुल जाधव नामदार जयाभाऊ गोरे गटाचे आहेत. तेच शरदबापू मोरे यांचे मेहुणे आहेत. त्यामुळे पहिल्यापासून राजकारण विरहित शरदबापू मोरे यांचे नामदार जया भाऊ गोरे यांच्याशी घरोब्याचे संबंध आहेत. सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर शरदबापू मोरे यांनी नागपूर येथे सत्कार केलेला आहे. त्यावेळी उद्योग व्यवसाय व कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते .
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
zxuf9d