पंचायत समिती माळशिरस सर्वच कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन
वाघोली (बारामती झटका)
माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार यांना दि. 12/12/2024 रोजी तात्कालीन कंत्राटी कर्मचारी यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली होती. तसेच आरोपीने गटविकास अधिकारी यांच्या खिशातील पाच हजार रुपये घेऊन गेले. तशा प्रकारचा गुन्हा माळशिरस पोलीस स्टेशनला नोंद झाला होता. परंतु, अद्यापपर्यंत गुन्हेगारास पोलीस स्टेशनमार्फत अटक करण्यात आलेली नसून गुन्हेगार हा मोकाट फिरत आहे. पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारहान व शिवीगाळ करणे ही घटना अतिशय निंदनीय व खेदजनक असून सदर घटनेचा निषेध पंचायत समिती माळशिरसच्या सर्वच संघटनांनी दि. 16 रोजी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर निषेध नोंदवून सदर आरोपीस 24 तासाच्या आत अटक न झाल्यास पंचायत समिती स्तरावरील सर्वच कर्मचारी संघटना काम बंद आंदोलन करणार असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. विजयसिंह माने देशमुख, कर्मचारी महासंघाच्या संघटना तालुका शाखेचे अध्यक्ष श्री. धन्यकुमार काळे, अभियंता संघटनेचे श्री. एन. अंबले रावसाहेब, महिला बालविकास पर्यवेक्षक संघटनेच्या श्री. कुलकर्णी मॅडम यांनी काम बंद आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
तसेच याबाबत माळशिरसचे तहसीलदार व माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलेले आहे. सदर वेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे पदाधिकारी श्री. दीपक गोरे, पी. बी. काळे, संतोष पानसरे, पांडुरंग एकतपुरे, सचिन बनकर, सुधाकर मुंगूसकर, विलास बाबर, तसेच महासंघाचे तालुकाध्यक्ष धन्यकुमार काळे, पंचायत समिती माळशिरसचे कक्षा अधिकारी बी. एच. कदम साहेब, मराठा सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष रवींद्र पवार महिला व बालविकास विभागातील कर्मचारी, अभियंता संघटनेचे माळशिरस तालुक्याचे सर्वच पदाधिकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे सर्वच पदाधिकारी, पंचायत समिती माळशिरसचे सर्वच कर्मचारी वृंद उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Here is my blog https://chemezova.ru/