भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे यांचे दुःखद निधन
अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील माळेवाडी अकलूज येथील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते विठ्ठलराव कृष्णाजी शिंदे यांचे अल्पशा आजाराने पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान बुधवार दि. १८/१२/२०२४ रोजी दुपारी २ वाजता दुःखद निधन झाले आहे. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
माळशिरस तालुक्याच्या राजकारणात सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्य केलेले ते नेते होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा पार्थिव देह पुणे येथून अकलूजकडे सायंकाळी ६ वाजता घेऊन निघालेले आहेत. अंत्यसंस्कार रात्री किंवा उद्या सकाळी याची माहिती मिळालेली नाही. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी संबंधितांना चौकशी करून यावे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व शिंदे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.