अबोबाबो…. विधान परिषद आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या आमदारकीवर टांगती तलवार तर , श्री शंकर साखर कारखान्याचे चेअरमन पद धोक्यात…
माळशिरस (बारामती झटका)
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार तत्कालीन पाणीदार खासदार व लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या विरोधातील उमेदवारांची तुतारी वाजविल्याचा भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना पक्ष कार्यालयाकडून पक्षविरोधी केलेल्या कार्यवाहीचा खुलासा मागितलेला असल्याने रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आलेली आहे तर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सोलापूर यांनी श्री. रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील रा. शंकरनगर, मु. पो. यशवंतनगर यांचेवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 88 अन्वये जबाबदारी निश्चित केलेली आहे. संचालक व चेअरमन पद धोक्यात आलेले आहे. याची राजकीय व सहकार क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे.
विधान परिषदेचे आमदार व श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांना आलेली नोटीस पुढील प्रमाणे आहे.
प्रादेशिक सहसंचालक (साखर), सोलापूर विभाग सोलापूर २७,२८ महामंगल कार्यालय, रविवार पेठ, कन्ना चौक, सोलापूर – ४१३००५
जा.क्र. प्राससंसो/क. ७३कअ नोटीस/सुनावणी/ / २०२४
दिनांक : ६/१२/२०२४
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८ (अ) (१) (b) मधील तरतुदीनुसार कारणे दाखवा नोटीस.
वाचले – १. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क अ आणि कलम ७८ (अ) (१) (b) मधील वैधानिक तरतुद.
२. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सोलापूर या बँकेबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ अंतर्गत प्राधिकृत अधिकारी यांनी दि. ०८/११/२०२४ रोजी सादर केलेला चौकशी अहवाल.
४. श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर या कारखान्याची दि. २६/०२/२०२४ रोजी जाहिर केलेली संचालक मंडळाची यादी.
ज्याअर्थी, श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिव नगर, ता. माळशिरस जि. सोलापूर हा सहकारी साखर कारखाना नोंदणी क्रं. एसयुआर/पीआरजी/ए/१/१९६८ दि. २२/०४/१९६८ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्याखालील नियम १९६१ अन्वये नोंदणी झालेला असुन सहकारी साखर कारखाना असून वैधानिकदृष्टया हा कारखाना या कार्यालयाच्या कार्यकक्षेत येतो. आणि ज्याअर्थी, वाचले क्रं. ४ नुसार श्री. रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील, रा. शंकरनगर, मु.पो. यशवंतनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर हे उक्त कारखान्याचे संचालक म्हणुन निवडुन आल्याचे जाहिर करुन त्यांना कारखान्याचे समिती सदस्य म्हणून मान्यता देण्यात आली आहे. आणि, ज्याअर्थी, हा साखर कारखाना व कारखान्याचे संचालक यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्याखालील नियम १९६१ आणि कारखान्याच्या उपविधीतील तरतुदीचे पालन करणे आवश्यक आहे. आणि,
ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क अ (III) मध्ये पुढील प्रमाणे तरतुद आहे. “जर त्या व्यक्तीला कलम ७९ किंवा ८८ खाली जबाबदार धरण्यात आले असेल किंवा कलम ८५ खालो चौकशीचा खर्च देण्यास जबाबदार धरण्यात आले असेल तर, अशी व्यक्ती समितीच्या सदस्यपदी राहण्यास निरहं उरेल” असे नमुद आहे. आणि,
ज्याअर्थी, वाचले क्रं.२ नुसार प्राधिकृत अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सोलापूर यांनी श्री. रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील रा. शंकर नगर, मु.पो. यशवंत नगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचेवर महाराष्ट्र सहकारी संस्थौ अधिनियम १९६० चे कलम ८८ अन्वये जबाबदारी निश्चित केलेली आहे. आणि,
म.स.सं. अधि. 1960 च क. 73 अन्वये सुनावणी नोटीस
ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क अ (III) मधील वरील तरतुदीनुसार आपण श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिव नगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर या सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी राहण्यास निरर्हता प्राप्त केलेली आहे.
त्याअर्थी, श्री. रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांना सदरची नोटीस देवून विचारणा करण्यात येते की, वाचले क्रं.२ अन्वये आपणांवर जबाबदारी निश्चित झालेली असल्यामुळे वाचले क्रं.१ मधील तरतुदीनुसार आपले श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिव नगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर या कारखान्यातील संचालक पदावर राहण्यास अपात्र का करण्यात येऊ नये? याबाबत आपण निम्नस्वाक्षरीकार यांचे कार्यालयात दिनांक ०६/०१/२०२५ रोजी दु. ३.०० वाजता उपस्थित राहुन आपले लेखी/तोंडी म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण आपले म्हणणे सादर न केल्यास किंवा सुनावणीस उपस्थित न राहिल्यास किंवा आपण सादर केलेले म्हणणे संयुक्तिक नसल्यास वाचले क्रं.१ मधील तरतुदीनुसार आपले श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिव नगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर या कारखान्यातील संचालक पद रद्द करण्यात येईल.
सदरची नोटीस आज दिनांक १६/१२/२०२४ रोजी माझ्या सही शिक्या निशी पारीत केली आहे.
स्थळ :- सोलापूर
दिनांक :- १६/१२/२०२४
(प्रकाश अष्टेकर)
प्रादेशिक सहसंचालक, (साखर) सोलापूर विभाग, सोलापूर
प्रति,
श्री. रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील, रा. सदाशिव नगर, मु.पो. यशवंत नगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर
प्रत :-
श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिव नगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर
प्रत कार्यवाहीस्तव :-
चेअरमन/कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मर्या., मुंबई
२/- आपणांस विनंती की, वरील नोटीस संबंधाने आपले स्पष्ट अभिप्राय/अभिमत दिनांक ०६/०१/२०२५ पुर्वी या कार्यालयाकडे सादर करावे. या संदर्भात उपलब्ध कागदपत्रे आपणांस आवश्यक असल्यास कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात येईल. मुदतीत अभिप्राय/अभिमत प्राप्त न झाल्यास आपणांस वरील नोटीस संबंधाने काहीच म्हणावयाचे नाही असे समजून पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
प्रत माहितीस्तव सविनय सादर :-
मा.आयुक्त, साखर, महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रशासक/मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सोलापूर
प्रादेशिक सहसंचालक, (साखर)
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.