ताज्या बातम्या

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग विस्तारीकरणाच्या निवाड्यात शासनाच्या पैशाचा अपव्यय झाला….

इको बोर्ड लिमिटेड वेळापूर फळझाडे ८५ लाख ५६ हजार ६९२ रुपयाचे नुकसान भरपाई चुकीच्या पद्धतीने दिली गेली….

माळशिरस (बारामती झटका)

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे विस्तारीकरण / चौपदरीकरण करण्याकरता बाजूच्या क्षेत्राचे सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्यात आलेले होते. माळशिरस तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ त्यामधील 59 किमी ते 117 किमी एकूण लांबी 58 किलोमीटर माळशिरस तालुक्यात सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस उपविभाग अकलूज यांच्या नियंत्रणात भूसंपादन झालेल्या जमिनी व अंतर्भूत असणारे पाईपलाईन फळझाडे वनझाडे यांचे मूल्यमापन करून भूसंपादन केलेल्या जमिनीचा निवाडा करून सदरच्या खातेदारांच्या नावे रक्कम आरटीजीएस द्वारे केली जात होती. सोलापूर जिल्ह्यातील मौजे वेळापूर, ता. माळशिरस येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 रस्त्याचे आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ भूसंपादित केलेल्या जमिनी करता दि. 11/01/2021 च्या निवाडा भूसंपादन एस आर/ 05/2018 .. अनुसार सन 2018-2021 या कालावधीमध्ये प्रधानासाठी तयार केलेले एकत्रित प्रमाणक त्यामध्ये इको बोर्ड गट नंबर 1417 पै मधील फळझाडे चिंच 06 नग त्याची किंमत 04 लाख 20 हजार 705 रुपये व उमरान कलम 1 नग त्याची किंमत 7 हजार 143 अशी एकूण 04 लाख 27 हजार 846 होत आहे. याच्या डबल द्यावयाची असते मात्र, तत्कालीन सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी उपविभाग माळशिरस अकलूज शमा पवार यांनी इको बोर्ड लिमिटेड वेळापूर यांना फळझाडाचे 85 लाख 56 हजार 692 रुपये त्यांच्या खात्यावर आरटीजीएस केलेले आहेत.

बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी माहितीच्या अधिकारांमध्ये सदरच्या निवड याची माहिती घेतल्यानंतर फळ झाडाचे जास्त पैसे इको बोर्ड लिमिटेड वेळापूर यांना गेलेले आहेत. सदरची बाब तत्कालीन निवासी जिल्हाधिकारी असणाऱ्या शमा पवार यांच्या कार्यालयात जाऊन सांगितलेली होती. त्यावेळेस त्यांनी सदरची रक्कम ज्यादा गेलेली आहे, ती वसूल केली जाईल असे सांगितले होते.

अद्यापपर्यंत वसूल केली का नाही हे पाहिलेले नाही मात्र, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या विस्तारी करणांमध्ये सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस उपविभाग अकलूज अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊन सदरचे कामकाज पूर्ण केलेले आहे. कार्यालयामधील कंत्राटी कर्मचारी तेच आहेत. त्यामुळे भूसंपादन करीत असताना अनेक चुका व अनियमितता झालेली पहावयास मिळत आहे. चुकून नकळत झालेल्या चुका आहेत ? का कंत्राटी कर्मचारी व सक्षम अधिकारी यांनी जाणीवपूर्वक केलेल्या आहेत ?, हे तपासून पाहणे गरजेचे आहे. कारण, भूसंपादित झालेली पत्र्याची घरे रातोरात दोन मजली इमारती तयार झालेल्या होत्या. शेतामध्ये पिण्याचे पाणी भरून घेऊन जावे लागत होते. त्या शेतामध्ये अचानक पाईपलाईनची जाळी तयार झाली. शेतामध्ये चिमणी बसायला झाड नव्हते परंतु फळझाडे व वन झाडे यांनी भूसंपादित झालेले क्षेत्र गजबजून गेलेले होते. त्यामुळे खऱ्या अर्थान भूसंपादित झालेल्या जमिनी व त्यावरील दिलेले मोबदले तपासून पाहणे गरजेचे आहे. लवकरच माहिती अधिकारांमध्ये माहिती संपादित करून जर बेकायदेशीर शासनाची फसवणूक अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांच्याकडून झालेली असेल तर महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे माहिती संकलित करून वाढीव गेलेली रक्कम पुन्हा शासनाकडे वर्ग करण्यासाठी पाठपुरावा बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील करणार आहेत. अजून कितीतरी भूसंपादित झालेले आहेत, त्यांना पैसे मिळालेले नाहीत. मात्र, गैरमार्गाचे लवकर पैसे अदा केले जातात, असाही भूसंपादित शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. लवकरच श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामध्ये गैरप्रकार उघड केला जाणार आहे. यासाठी संबंधितांनी श्रीनिवास कदम पाटील 98 50 10 49 14 या नंबर वर संपर्क साधावा असे पिडीतांना आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button