कण्हेर जिल्हा परिषद गट प्रस्थापित मोहिते पाटील विरोधी विजयाची परंपरा कायम ठेवणार…

भारतीय जनता पार्टीकडून कण्हेर जिल्हा परिषद गटात धर्मराज माने यांच्या नावाची चर्चा..
माळशिरस (बारामती झटका)
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास काही महिन्याचा कालावधी आहे, तोपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीमध्ये कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या मताधिक्यावरून कण्हेर जिल्हा परिषद गट प्रस्थापित मोहिते पाटील विरोधी गटाकडे विजयाची परंपरा कायम ठेवणार, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. कण्हेर जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीकडून युवा नेते धर्मराज माने यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा समजला जाणारा कण्हेर जिल्हा परिषद गटामध्ये दोन पंचायती समीती गण त्यामध्ये गिरवी पंचायत समिती गण व कण्हेर पंचायत समिती गण. त्यामध्ये कन्हेर गणामध्ये इस्लामपूर, कण्हेर, रेडे, भांब, माणकी, जळभावी ही गावे येतात तर गिरवी गणामध्ये लोणंद, लोंढे-मोहितेवाडी, गिरवी, फडतरी, पिंपरी, कोथळे ही गावे येतात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये या कण्हेर जिल्हा परिषद गटामधील कण्हेर गणातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांना 310 मताच लीड तर फडतरी पंचायत समिती गणामधून 1911 मताचे लीड मिळाले होते, असे एकूण कण्हेर गणातून 2221 मताचे लीड राम सातपुते यांना मिळालं होते. यामध्ये इस्लामपूर, कण्हेर, माणकी, जळभावी या गावातून उत्तमराव जानकर यांना 416 मताचं लीड मिळालं होतं. तर भांब व रेडे या दोन गावातून राम सातपुते यांना 646 मताचे लीड मिळालं होतं. हे वजा करता 230 मताधिक्य कण्हेर गणातून राम सातपुते यांना मिळाले होत. तर फडतडी गणातून लोणंद, लोंढे-मोहितेवाडी, गिरवी, फडतरी, पिंपरी या गावातून1828 मताचे लीड मिळालं होतं राम सातपुते यांना, तर कोथळे गावातून फक्त 83 मतांचं लीड उत्तमराव जानकर यांना मिळाले होते. त्यामुळे या कण्हेर जिल्हा परिषद गटातून 2221 मताचे लीड भारतीय जनता पार्टीला मिळालं होते. त्यामुळे कण्हेर जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत.
कण्हेर जिल्हा परिषद गटाची निर्मिती नव्याने झालेली आहे. पूर्वी याच गटाला मांडवे जिल्हा परिषद गट असे नाव होते. त्यामध्ये काही गावांची अदलाबदल झालेली आहे. मात्र, बऱ्यापैकी तीच गावे या गटामध्ये राहिलेली आहेत. या गटाचे नेतृत्व काकासाहेब मोटे आणि सौ. छायादेवी सुरेशराव पालवे पाटील यांनी केलेले होते. गतवेळच्या निवडणुकीत निमगाव जिल्हा परिषद गटात याच गावांचा समावेश होता तरीसुद्धा, भाजपच्या ज्योतीताई के. पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. कण्हेर जिल्हा परिषद गट जुना असो किंवा नवीन असो कायम प्रस्थापित मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत. हीच परंपरा विधानसभेच्या निवडणुकीतील मताधिक्य पाहिल्यानंतर जरी उत्तमराव जानकर व मोहिते पाटील दोन्ही गट एकत्र आलेले असले तरीसुद्धा जानकर व मोहिते पाटील विरोधी असणाऱ्या गटाला मताधिक्य मिळालेले असल्याने कण्हेर जिल्हा परिषद गट प्रस्थापित मोहिते पाटील विरोधातील जिल्हा परिषद सदस्य निश्चित होईल, असा आत्मविश्वास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
सध्या जिल्हा परिषदेचे वारे वाहत असल्याने भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सक्रिय भाग घेणार आहेत आणि सध्या केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार आहे. सर्वात महत्त्वाचे कण्हेर जिल्हा परिषद गटाच्या शेजारील बांधकरीच असणारे आणि लोकसभा ज्यांच्या अधिपत्याखाली लढले गेले ते ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयाभाऊ गोरे यांचेही विशेष सहकार्य लाभणार असल्याने कण्हेर जिल्हा परिषद गट हा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात राहील, असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. युवा नेते धर्मराज माने यांच्या बरोबर दोन-तीन व्यक्तींची नावे चर्चेत आहेत मात्र, धर्मराज माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असेही भाजपच्या गोटातून बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.