सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत संतोषकुमार उघडे यांची शाखाधिकारी पदी निवड
अकलूज (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खंडाळी शाखेत लिपिक पदावर काम करीत असलेले संतोषकुमार उघडे यांचे मळोली ता. माळशिरस, शाखेत शाखाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. ते १९९७ पासून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवेत लिपिक पदावर कार्यरत होते. यापुर्वी त्यांनी निमगाव (म.), खुडूस, वेळापूर, बोंडले, खंडाळी या शाखेत काम केले आहे. त्यांचे कामकाज पाहून वरिष्ठांनी त्यांची पदोन्नती केली. यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यानिमित्त त्यांचा खंडाळी शाखेत सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच बाबुराव पताळे, सोसायटी चेअरमन नामदेव पताळे, सुभाष पताळे, खंडाळी शाखेचे शाखाधिकारी व्ही.बी. पवार, बॅंक इन्स्पेक्टर गेजगे सो, लिपिक वसुंधरा इंगवले देशमुख मॅडम, संतोष मोरे, अण्णा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.