वाढत्या सुशिक्षित बेरोजगारीची समस्या…!!!
अकलूज (बारामती झटका)
सुशिक्षित बेरोजगारी हा महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण भारतापुढे निर्माण झालेला एक ज्वलंत प्रश्न आहे..!! शिवाय वाढती लोकसंख्या आणि नोकरीच्या मागणीमुळे भारतात बेरोजगारीची समस्या खूप गंभीर आहे. या समस्येकडे दुर्लक्ष केले तर हे राष्ट्राच्या विनाशाचे कारण ठरणार हे मात्र नक्की…!!! जसं की सर्वांना माहिती आहे, रोजगाराचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे बेरोजगारी आणि दुसरी म्हणजे सुशिक्षित बेरोजगारी..!!
भारतामधल्या अर्ध्या युवांचे म्हणणे आहे की, शिकून काय फायदा ?, शिकून कुठे रोजगार मिळतो, मला या बाबतीत समाधानाची एक बाब वाटते की, अलीकडच्या युवा पिढीची आणि त्यांच्या कुटुंबीयांची या बाबतीत विचार करण्याची पद्धत थोड्या प्रमाणात सुधारलेली दिसतेय.. प्रश्न निर्माण होतो कशी ? मी माझ्याच महाविद्यालयचं उदाहरण देते, महाविद्यालयात खूप मुली आहेत, ज्यांचे लग्न झाले आहे पण तरीही त्यांनी शिक्षण घेणे बंद केले नाही..!! पूर्वी शिक्षणाला दुय्यम स्थान देणारे आणि लग्नाला प्राधान्य देणारे आता शिक्षणालाही प्राधान्य देऊ लागले आहेत…!!! पूर्वी समाजातल्या लोकांचा एक समज असायचा की, एका ठराविक कालखंडापर्यंत शिक्षण द्यायचे आणि नंतर मुलाचा आणि मुलीचा विवाह केला जाई..!! पण कालांतराने त्यांना समजले की, शिक्षणाशिवाय रोजगार मिळवणे अशक्य आहे…!!!
अर्धा युवा शिक्षित असूनही बेरोजगार आहे, नवीन अहवालानुसार भारतात एकूण बेरोजगारांपैकी तरुण बेरोजगारांची संख्या सुमारे 83% आहे, आणि हा आकडा हळूहळू वाढत आहे…!!! उच्च शिक्षित बेरोजगारांचे प्रमाण 2000 साली 54% होते, 2022 मध्ये 65.7% टक्के तर आता 83% एवढी आहे…!!! सुशिक्षित बेरोजगारी वाढण्याचीही अनेक कारणे आहेत..!! जसं की आहे ती नोकरी जाणं, काही राजकीय निर्णय, आणि महत्वाचं म्हणजे वशिला आणि लाज!! आजकाल आपण पाहतो की, एखाद्या व्यक्तीला रोजगाराची खूप गरज असेल आणि त्याच्याकडे गुणवत्ता असूनही त्या व्यक्तीला रोजगार मिळत नाही आणि दुसरीकडे एखाद्या व्यक्तीकडे काहीच गुणवत्ता नाही, काम करणाऱ्या नोकरी संदर्भात काहीच माहिती नाही तरीही त्याला वशिल्याने आणि लाच देऊन लगेच नोकरी लागते आणि जो व्यक्ती गरजू आहे तो गरजूच राहतो आणि त्याच्यापुढे प्रश्न निर्माण होतो की आता पुढे काय ? जर रोजगार मिळाला नाही तर आपलं कसं होणारं ? काही सुशिक्षित बेरोजगार स्वतःच्या नशिबाला दोष देत म्हणतात, माझ्या नशिबात यशच नाही पण खरंतरं त्यांनी स्वतः स्वतःच नशीब असं बनवलेलं असतं…!!! नोकरी मिळेल या आशेने रोज बाहेर पडणारे प्रफुल्लित चेहरे संध्याकाळी मात्र बसचे धक्के खात-खात कोमेजलेले चेहरे होऊन घरी परततात…!!!
बेरोजगारी कमी करायची असेल तर महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षण पद्धतीत सुधारणा करणे, शाळा कॉलेजमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष प्रात्यक्षिक माहिती मुलांना द्यायला हवी, त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःला हे जाणवेल की, त्यांना कोणत्या क्षेत्रात रुची आहे..!! भविष्यातील बेरोजगारी कमी करायची असेल तर तरुण युवकांनीही स्वतःच्या गुणवत्ता वाढवायला हव्या.. शाळा, कॉलेजमध्ये होणाऱ्या कला स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला हवा जेणेकरून भविष्यात महाराष्ट्राला उत्तम नट-नटी, चित्रकार, गायक, नर्तक असे अनेक कलाकार मिळतील…!!! सुशिक्षित बेरोजगारीचं कुलूप उघडायचं असेल तर रोजगाराची किल्ली शोधावी लागेल, कारण बंद दारामागे अनेक संधी आहेत!!!
गौरी कांचन विज्ञान लोंढे.
(शंकरराव मोहिते महाविद्यालय,अकलूज बी.ए भाग 1)
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Hello Neat post Theres an issue together with your site in internet explorer would check this IE still is the marketplace chief and a large element of other folks will leave out your magnificent writing due to this problem