ताज्या बातम्या

तुकाराम काळे परिवार यांचा सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्याचा तिसऱ्या पिढीचा वारसा संतोष मालक यशस्वीपणे सांभाळत आहे….

नातेपुते येथील काळे परिवारातील स्वकर्तृत्वावर समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारे युवा उद्योजक संतोषमालक काळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनावर टाकलेला दृष्टिक्षेप…

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते ता. माळशिरस, या गावच्या जडण घडणीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्व नातेपुते विकास सेवा सोसायटीचे चेअरमन नातेपुते ग्रामपंचायतचे सदस्य व नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे फाउंडर सदस्य तुकाराम विठोबा काळे यांचा सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्याचा तिसऱ्या पिढीचा वारसा युवा उद्योजक संतोष मालक काळे हे यशस्वीपणे सांभाळत आहेत. नातेपुते येथील काळे परिवारातील स्वकर्तृत्वावर समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारे युवा उद्योजक राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले असे युवा उद्योजक संतोष मालक काळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनावर टाकलेला दृष्टीक्षेप आहे.

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात उद्योग, व्यवसाय व व्यापार यासाठी सुप्रसिद्ध असणारे नातेपुते शहर आहे. नातेपुते शहराच्या जडण घडणीत काळे परिवार यांचा सिंहाचा वाटा आहे. तुकाराम विठोबा काळे यांनी नातेपुते विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सलग 22 वर्ष चेअरमन पदाची धुरा सांभाळलेली आहे. तत्कालीन नातेपुते ग्रामपंचायतीचे सदस्य झालेले होते.‌ नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे फाउंडर सदस्य म्हणून काम केलेले होते. काळे परिवार यांचा राजकीय वारसा पुढे काळे परिवारातील अनेक सदस्यांनी सांभाळलेला आहे. एडवोकेट डी. एन. काळे यांनी सोलापूर जिल्हा परिषद सदस्य पद भूषविलेले आहे. संजय दामोदर काळे यांनी माळशिरस पंचायत समितीचे सभापती पद भूषविलेले आहे. संतोष मालक यांचे डी. एन. काळे चुलते तर संजय काळे चुलत बंधू आहेत. असे अनेक राजकारणात व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे काळे परिवार आहे.

श्री. चंद्रकांत तुकाराम काळे व सौ. इंदुबाई चंद्रकांत काळे यांना दोन मुले आणि तीन मुली. त्यामध्ये 28/12/1979 साली संतोष मालक काळे यांचा जन्म झालेला आहे. घराण्याचा राजकीय वारसा असताना शैक्षणिक सुद्धा वारसा जपण्याचे काम संतोष मालक यांनी करून बी. ए. पदवी शिक्षण पूर्ण केलेले आहे. शिक्षण करून नोकरी करावयाची नाही, त्यामुळे स्वतःचा व्यवसाय नातेपुते-दहिगाव रोड चौकामध्ये स्वतःच्या जागेमध्ये 2002 साली सुरू केला, तो आज तागायत सुरू आहे. उद्योग व्यवसायाबरोबर संतोष मालक यांनी 2010 पासून सक्रिय राजकारणाला सुरुवात केलेली होती. 2015 साली वार्ड क्रमांक तीन मधून निवडणूक लढवली होती. 2016साली नातेपुते सोसायटीचे संचालक व सहसचिव पदावर काम केलेले आहे. समाजामध्ये कार्यातून आपला वेगळा ठसा निर्माण व्हावा, सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी, यासाठी 2017 साली जय मल्हार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची स्थापना करून संस्थापक अध्यक्ष होऊन खऱ्या अर्थाने सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कामाला सुरुवात केलेली होती.

श्रीराम हरी रुपनवर नागरी पतसंस्थेत 2020 साली व्हॉइस चेअरमन पदाची धुरा सांभाळलेली होती. दुसऱ्याच्या पतसंस्थेत यशस्वीपणे काम केल्यानंतर बळीराजा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सन 2023 ला सुरू करून सदर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष झालेले होते. दीड वर्षाच्या कालावधीमध्ये सव्वा दोन कोटीच्या पुढे ठेवी व वाटप केलेले होते. चांगल्या पद्धतीने पतसंस्था चालवलेली आहे. दिवसेंदिवस राजकारणातील व समाजकारणातील चढता आलेख वाढत होता. सन 2024 ला नातेपुते एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय व्हॉइस चेअरमन पदी त्यांची निवड करण्यात आलेली होती. घराण्याचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वारसा आजसुद्धा काळे परिवारातील तिसरी पिढी संतोष मालक काळे यांच्या रूपाने सक्षमपणे सांभाळत आहे.

28 डिसेंबर, वाढदिवस त्यानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत होता. अनेकांनी भेटून, व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर शुभेच्छा देऊन भविष्य कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या होत्या. बारामती झटका परिवार यांचेकडून नातेपुते नगरपंचायतीमध्ये काम करण्याची संधी मिळावी, अशाही पद्धतीने शुभेच्छा देण्यात आलेल्या होत्या. संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी जिवलग मित्र संतोष मालक काळे यांच्या जीवनावर वाढदिवसानिमित्त टाकलेला प्रकाशझोत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button