लोकप्रिय दमदार राम सातपुते यांनी ज्येष्ठ नेते किशोरसिंह माने पाटील यांचा सन्मान केला…

अकलूज (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते किशोरसिंह माने पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला. यावेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती युवा नेते हंसराज माने पाटील, जयराज माने पाटील, कीर्तीसिंह माने पाटील, उद्योजक पंप्पू भोसले, भाजप अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
माळशिरस तालुक्याच्या जडणघडणीत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, कर्मवीर बाबासाहेब माने पाटील, धर्मवीर सदाशिवराव माने पाटील या त्रिमूर्तींचे योगदान आहे. कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांचे चिरंजीव श्री. किशोरसिंह माने पाटील यांनी राजकारणाचा वसा व वारसा चालविलेला आहे. अकलूज ग्रामपंचायत सरपंच पदाचा पदभार सांभाळलेला आहे. समाजामध्ये किशोरसिंह माने पाटील यांनी जाती-धर्माच्या पलीकडे आपले व्यक्तिगत मैत्रीचे संबंध जपलेले आहेत.

वाढदिवसानिमित्त लोकप्रिय दमदार राम सातपुते यांनी अकलूज येथे येऊन किशोरसिंह माने पाटील यांना शुभेच्छा दिलेल्या असल्याने अकलूज पंचक्रोशीत राजकीय खळबळ उडालेली असून नवीन राजकीय समीकरणाची नांदी वाढदिवसानिमित्त अकलूज पंचक्रोशीत पहावयास मिळेल, असाही राजकीय विश्लेषकांकडून अंदाज व्यक्त केला जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.