लोकप्रिय राम सातपुते यांची जनता दरबारातून गोरगरीब व सर्वसामान्य जनतेत लोकप्रियता वाढल्याने विरोधी नेते व कार्यकर्त्यांची उदासीनता वाढली..

राजकारणाचा बाजार मांडून घराच्या दारात जनतेला वेठीस धरणारे जनता दरबाराच्या नावावर जनतेच्या दारात नेत्यांना जाण्याची दुर्दैवी वेळ..
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात जनता दरबाराची संकल्पना प्रथमच राबवली. जनता दरबारामध्ये गोरगरीब व सर्वसामान्य जनतेने आपली स्वतःची व सार्वजनिक कामे करून घेतलेली आहेत. लोकप्रिय आमदार राम सातपुते यांची जनता दरबारातून गोरगरीब व सर्वसामान्य जनतेत लोकप्रियता वाढल्याने विरोधी नेते व कार्यकर्त्यांची उदासीनता वाढलेली आहे. त्यासाठी जनतेतील कार्यक्रम डोहाळेजेवण, बारसे, जागरण गोंधळ, लग्न, सोळावी, वाढदिवस, नवीन गाडी पूजन, देदीप्यमान यशाबद्दल सत्कार असे अनेक प्रयोग करून सुद्धा गोरगरीब व सर्वसामान्य जनता दाद देत नसल्याने राजकारणाचा बाजार मांडून घराच्या दारात अनेक पिढ्या जनतेला ब्रिटिश धरणारे जनता दरबाराच्या नावावर जनतेच्या दारात नेत्यांना जाण्याची दुर्दैवी वेळ आलेली असल्याची राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा सुरू आहे.
माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची केलेली कामे घेऊन राम सातपुते निवडणुकीला सामोरे गेलेले होते. तर विरोधी गटाकडून मोहिते पाटील यांचे तीन पिढ्याचं राजकारण व उत्तमराव जानकर यांचा 30 वर्षाचा राजकीय संघर्ष असे असताना राम सातपुते यांना माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत 01 लाख 08 हजारापेक्षा जास्त मतदान मिळालेले होते. याचे खरे कारण गेल्या पाच वर्षांमध्ये खऱ्या अर्थाने रखडलेला विकास केलेला होता. जनता दरबारातून जनतेला हक्काचे व्यासपीठ निर्माण केलेले असल्याने राम सातपुते यांना लोकप्रिय अशी उपाधी मिळालेली होती. माळशिरस तालुक्याला दमदार निधी उपलब्ध करून दिलेला असल्याने दमदार ही पदवी मिळालेली होती. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे कितीतरी लाखो रुपयाची ऑपरेशन केलेली असल्याने खऱ्या अर्थाने गोरगरिबांचे आरोग्यदूत झालेले होते.
अशा लोकप्रिय दमदार आरोग्य दूत राम सातपुते यांच्या पाठीशी सर्वसामान्य व गोरगरीब जनता ठाम उभी राहिलेली होती. विधानसभेच्या निवडणुकीत निसटता पराभव झालेला असला तरी जनतेशी नाळ तुटू दिलेली नाही. श्रीराम बंगला येथे जनता दरबार घेतलेले आहेत. वर्षाच्या शेवटी अकलूज येथे जनता दरबार घेतल्यानंतर अनेक नेते व कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. अनेकजण प्रयोग करतील मात्र, जनतेच्या पदरी घोरनिराशाच होणार असल्याने आमदार राम सातपुते यांच्याच जनता दरबारात गोरगरीब व सर्वसामान्य जनता येत राहणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.