मलठणमध्ये राजे गटाला खिंडार; खलाटे परिवार यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश…
फलटण नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या प्रयत्नांना यश….
फलटण (बारामती झटका)
फलटण नगरपरिषद हद्दीमधील मलठणमध्ये राजे गटास खिंडार पडले आहे. श्रीराम सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री. प्रमोद उर्फ आबा खलाटे व कुटुंबीय यांनी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार श्री. रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे विकास कामावर प्रेरित होऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी मलठण मधील त्यांचे कुटुंबीय हजर होते. खलाटे कुटुंबीय यांच्या प्रवेशासाठी मलठणमधील नगरसेवक श्री. अशोकराव जाधव यांचेकडून विशेष प्रयत्न करण्यात आले.
मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजप मध्ये त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. फलटण विधान परिषदेमध्ये दैदीप्यमान यश संपादन केल्यानंतर फलटण नगर परिषद निवडणुकीत राजे गटाचा दारुण पराभव करण्याची रणनीती पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या समर्थकांमधून सुरू आहे. फलटण शहर व ग्रामीण भागात राजे गटातील नेते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विश्वास ठेवून प्रवेश करीत असल्याने दिवसेंदिवस राजे यांचा राजकीय गड ढासळत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.