सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी यांच्यासाठी कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक – पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे नागरिकांना आवाहन
सोलापूर (बारामती झटका)
आधुनिक जगात ऐकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी मोबाईल हे महत्वपूर्ण साधन असून सामान्य नागरिकांकडे देखील मोबाईल हे उपकरण उपलब्ध आहे. पोलीस ठाणे हद्दीतील सामान्य नागरिक त्यांच्या तकार व मदतीसाठी संबंधीत पोलीस ठाणेच्या अधिकारी यांचेशी संपर्क साधत असतात. परंतू ठरावीक कालावधी नंतर पोलीस अधिकारी यांची बदली झाल्यानंतर संबंधीत अधिकारी हे त्यांचेकडील मोबाईल हे सोबत घेवून जातात. यामुळे सामान्य जनतेला पुन्हा संपर्क करण्यात अडचणी निर्माण होतात.
या अडचणीवर मात करण्यासाठी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे संकल्पनेतून पोलीस अधीक्षक ते पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना शासकीय मोबाईल खरेदी करून त्यामध्ये विशीष्ट कमांकाचे मोबाईल क्रमांकाचे सीमकार्ड घालून पोलीस ठाणेस दिले आहेत. यामुळे पुढे जरी पोलीस प्रभारी अधिकारी यांची पोलीस ठाणेवरून बदली झाली तरी संबंधीत पोलीस ठाणेच्या प्रभारी अधिकारी यांचा मोबाईल कमांक तोच राहणार आहे. यामुळे पोलीस व जनता यांचा संपर्क चांगल्या व मोठ्या प्रमाणात राहून कामकाज करणे सोयीचे होणार आहे. सदर मोबाईल कमांक पुढील प्रमाणे.
तरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी याद्वारे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपले अडी-अडचणी, मदतीसाठी उपरोक्त क्रमांकावर संपर्क करावा.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.