राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मगावी जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन…
दि. ३ ते १४ जानेवारी २०२५ रोजी सावित्री, जिजाऊ, संत चोखामेळा महाराज जन्मोत्सव व समाज प्रबोधन समारोह
सिंदखेडराजा (बारामती झटका)
सिंदखेडराजा जि. बुलढाणा, येथे सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, संत चोखामेळा महाराज जन्मोत्सव व समाज प्रबोधन समारोह कार्यक्रमाचे आयोजन दि. ३ जानेवारी ते १४ जानेवारी २०२५ पर्यंत करण्यात आले आहे. त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे मराठा सेवा संघाद्वारे ४२७ व्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे दि. १२ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले आहे.
दि. ३ जानेवारी २०२५ रोजी सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सव उद्घाटन सोहळा, दि. ४ ते १० जानेवारी सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सवानिमीत्त परिसरातील शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ‘सांस्कृतीक कार्यक्रम’ दररोज सकाळी ११ ते ५ पर्यंत, दि. ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वा. जिजाऊ सृष्टी येथे बक्षीस वितरण समारंभ, सायंकाळी ५ वाजता जिजाऊ जन्मस्थळ राजवाड्यावर ‘दिपोत्सव’, सायंकाळी ५.३० वाजता ‘मशाल यात्रा’ (राजवाडा ते जिजाऊ सृष्टी), सायंकाळी ८.३० वाजता महिलांचा सांस्कृतीक कार्यक्रम जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सादर होणार आहे.
दि. १२ जानेवारी २०२५ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा होणार आहे. सकाळी ६ वाजता महापूजा (राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा), सकाळी ७ वाजता भव्य पालखी सह वारकरी दिंडी (राजवाडा ते जिजाऊ सृष्टी), सकाळी ९ वाजता शिवधर्म ध्वजारोहण, सकाळी ९ ते १.३० शाहीरांचे पोवाडे, नवोदित वक्ते, सांस्कृतिक कार्यक्रम विशेष सत्कार, प्रकाशन सोहळा, राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी मराठा सेवा संघ व ३२ कक्ष यांचे मनोगत, सामुहिक विवाह सोहळा, विधवा, घटस्फोटीत व पुनर्विवाह सोहळा (स्थळ – जिजाऊ सृष्टी हॉल) येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवश्री नवनाथजी घाडगे प्रदेश कार्याध्यक्ष, म.से.सं. व सर्व कक्षांचे प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
दि. १३ जानेवारी २०२५ रोजी मेहूणाराजा ता. दे. राजा जि. बुलढाणा येथे संत चोखामेळा महाराज जन्मोत्सव व समाज प्रबोधन समारोह होणार आहे. दि. १३ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता शि.भ.प. ज्योतीताई जाधव, सिंदखेड राजा यांचे शिवकीर्तन होणार आहे. दि. १४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजता संत चोखामेळा महाराज जन्मस्थळ येथे महापुजा करण्यात येणार आहे.
यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, क्रांतीपुरुष शिवश्री ॲड. पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांचा अमृतमहोत्सवीय अभिष्टचिंतन सोहळा शिवश्री मा.ना.श्री. प्रतापरावजी जाधव (केंद्रीय आयुष मंत्री, भारत सरकार) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. दुपारी २ ते ५ वा. शिवधर्म पीठ होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवश्री विजयकुमार घोगरे ( प्रदेशाध्यक्ष, मराठा सेवा संघ) हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवश्री संजयजी गायकवाड (आमदार बुलढाणा विधानसभा मतदार संघ), शिवश्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे (मा. मंत्री महाराष्ट्र राज्य), शिवश्री मनोजभाऊ कायंदे (आमदार सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघ), शिवमती रेखाताई खेडेकर (माजी आमदार, चिखली), शिवश्री सिध्दार्थजी खरात (आमदार मेहकर विधानसभा मतदार संघ), शिवश्री डॉ. शशिकांत खेडेकर (मा. आमदार सिंदखेड राजा), शिवश्री धिरजजी लिंगाडे (आमदार विधान परिषद), शिवश्री कामाजी पवार (राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ), शिवश्री अर्जुनराव तनपुरे (जेष्ठ मार्गदर्शक, मराठा सेवा संघ), शिवश्री इंजी. मधुकरराव मेहेकरे (अध्यक्ष, जिजाऊ सृष्टी), शिवश्री चंद्रशेखरजी शिखरे (महासचिव, मराठा सेवा संघ), शिवश्री नवनाथजी घाडगे (प्रदेशकार्याध्यक्ष, मराठा सेवा संघ), शिवश्री मनोज आखरे (प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड), शिवमती सिमाताई बोके (प्रदेश अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड) आदी मान्यवर असणार आहेत.
यावेळी शिवश्री ॲड. पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब (संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ) यांचे समारोपीय मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे.
इतिहासातील महानायिका, जगातील स्त्रित्वाचा अत्युच्च आविष्कार, स्वराज्यजननी, राष्ट्रमाता, लोकमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मोत्सव सोहळा २०२५ भव्य दिव्य स्वरुपात साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येने जिजाऊ सृष्टी येथे दुपारी २.०० वा. येण्यासाठी आणि “तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय” या जयघोषाने संपुर्ण आसमंत दणाणून टाकण्यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे. मातृतीर्थावरील वैचारिक समाज क्रांतीचे भागीदार बनून समाजाला नवी दिशा देण्यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.