Uncategorized

माळशिरस शहराच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही – लोकप्रिय दमदार राम सातपुते…..

माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख व नूतन बिनविरोध नगराध्यक्ष वस्ताद विजयराव देशमुख यांचा श्रीराम निवासस्थानी सन्मान संपन्न झाला…..

माळशिरस (बारामती झटका)

केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी पाठपुरावा करण्यास कटिबद्ध आहे. माळशिरस शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे. तालुक्यातील महत्त्वाची कार्यालय माळशिरस शहरात आहेत. शहरात वास्तव्यास असणारे नागरिक व बाहेरून येणाऱ्या कामानिमित्त जनतेच्या हितासाठी माळशिरस शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी माळशिरस नगरपंचायत हद्दीत विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे माळशिरस नगरपंचायतीचे नूतन बिनविरोध नगराध्यक्ष वस्ताद विजयराव देशमुख यांचा सन्मान मांडवे येथील निवासस्थानी संपन्न झाला, भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देताना भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी सत्काराप्रसंगी सांगितले.

माळशिरस नगरपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचा नूतन बिनविरोध नगराध्यक्ष विजयराव देशमुख यांच्या रूपाने झेंडा फडकलेला आहे. याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक निमंत्रित सदस्य व माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख, नूतन बिनविरोध नगराध्यक्ष वस्ताद विजयराव देशमुख यांना एकाच हारात घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी चि. विराज व चि. साईराज विजयराव देशमुख यांची दोन मुले, काका व वडिलांचा एकाच हारात सत्कार करताना उपस्थित होते. देशमुख परिवार यांच्या वतीने लोकप्रिय दमदार राम सातपुते यांचा सन्मान करण्यात आला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button