जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरी या शाळेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न
वेळापूर (बारामती झटका)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरी नं. १ व २ या शाळेतील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा कौतूक सोहळा शेरी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केला होता. सदर स्पर्धेमध्ये धावण्याच्या स्पर्धेत २०० मीटर प्रथम क्रमांक मेघराज कमलाकर माने देशमुख, १०० मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक सूरज मारुती शेंडगे, मुलीमध्ये धावणे १०० मीटरमध्ये साक्षी मारुती शेंडगे, द्वितीय, उत्तेजनार्थ ऋतुजा मिलिंदराव साठे, बुध्दीबळ स्पर्धेत तृतीय आर्यन मिलिंदराव माने देशमुख या यशस्वी विद्यार्थ्यांचा कमलाकर माने देशमुख यांनी सत्कार केला.
प्रथम क्रमांकांच्या दोन्ही विद्यार्थ्यांना रोख रक्कम व शाळा व्यवस्थापन समिती शेरी नं. २ चे अध्यक्ष सुधीर माने देशमुख यांनी इतर तीन विद्यार्थ्यांना रोख रक्कम बक्षीस देऊन प्रेरणा दिली.सदर कौतुक सोहळा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, बाळासाहेब (तात्या) माने देशमुख, महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतभैय्या माने देशमुख, धनंजय माने देशमुख, धैर्यशील माने देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती कमलाकर माने देशमुख, सुधीर माने देशमुख, मिलिंदराव माने देशमुख, भारत माने देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती शेरी नं. २ चे उपाध्यक्ष यल्लाप्पा शेंडगे, सोमनाथ कदम, ब्रम्हदेव खराडे, मुकुंद साठे, जितेंद्र खंडागळे, कुमार यादव, गणेश साठे, शामराव कांबळे, नवनाथ मेटकरी जिल्हा परिषद शाळा शेरी नं. १ व २ शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.