चांडाळ चौकडीच्या करामती फेम ह भ प भरत शिंदे उर्फ बाळासाहेब यांच्या कीर्तनाचे आयोजन…
विझोरी गावचे प्रगतशील बागायतदार स्वर्गीय भीमराव ईश्वरा राचकर उर्फ भिमादादा यांच्या तेराव्या निमित्त सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन….
विझोरी (बारामती झटका)
विझोरी ता. माळशिरस, येथील प्रगतशील बागायतदार स्व. भीमराव ईश्वरा राचकर उर्फ दादा यांचा तेरावा कार्यक्रम सोमवार दि. १३/०१/२०२५ रोजी होणार आहे. त्यानिमित्त ह. भ. प. भरत शिंदे महाराज (चांडाळ चौकडीच्या करामती फेम बाळासाहेब) कांबळेश्वर, ता. बारामती यांचे फुलांचे कीर्तन सकाळी १० ते १२ या वेळेत विझोरी, ता. माळशिरस येथे होणार आहे. यानंतर १२.०५ मि. पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
प्रगतशील बागायतदार स्व. भीमराव ईश्वरा राचकर यांचे वयाच्या ५८ वर्षी अल्पशा आजाराने गुरुवार दि. ०२/०१/२०२५ रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सहा भाऊ, भाऊजया, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य कृषिभूषण श्री. पांडुरंग ईश्वरा राचकर यांचे ते लहान बंधू होते.
विझोरी येथील राचकर परिवारातील सात बंधू यांनी शेती, उद्योग, व्यवसायामध्ये प्रगती करून समाजामध्ये राचकर परिवाराचे नाव केलेले होते. सर्व बंधूंचे विचार एक आहेत. त्यामधील स्वर्गीय भीमराव उर्फ दादा यांच्या अकाली मृत्यूने राचकर परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.
तरी, या तेरावा कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त राचकर परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.