ताज्या बातम्याराजकारण

मुख्यमंत्री देवाभाऊ, अजब तुमचे सरकार म्हणण्याची वेळ दुष्काळी जनतेवर येऊ नये, खबरदारी घ्यावी नाही तर येरे माझ्या मागल्या, अन् ताक कण्या चांगल्या…

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा कार्यकारी अभियंता तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी द. यी. दामा यांना आशीर्वाद आहे का ? उलट सुलट चर्चा…

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान करून आमदार केले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सरकार स्थापन होऊन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 33 कॅबिनेट व 06 राज्यमंत्री यांचा शपथविधी होवून खातेवाटप सुद्धा केलेले आहे. महाराष्ट्र सरकारने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस यांनी महायुतीचे सरकार असताना ई-टेंडरिंग प्रक्रिया प्रभावीपणे राबविलेली होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार दरम्यानच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये असताना ई-टेंडरिंग प्रक्रिया ढेपाळलेली होती. पुन्हा देवेंद्रजी फडणवीस उर्फ देवाभाऊ यांचे सरकार स्थापन होऊन सुद्धा द. यी. दामा कार्यकारी अभियंता तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी ई-टेंडरिंग निविदा ओपन करीत असताना नियम धाब्यावर बसवून अनियमितता करून ई-टेंडर ओपन केलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उर्फ देवाभाऊ, अजब तुमचे सरकार म्हणण्याची वेळ दुष्काळी जनतेवर येऊ नये, खबरदारी घ्यावी नाहीतर ग्रामीण भागात म्हण प्रचलित आहे, येरे माझ्या मागल्या, अन् ताक कण्या चांगल्या, अशी महायुतीच्या सरकारची अवस्था होऊ नये. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा कार्यकारी अभियंता तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी दामा यांना आशीर्वाद आहे का ?, अशी उलटसुलट चर्चा माळशिरस तालुक्यासह जिल्ह्यात सुरू आहे.

मृदा व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये ४२ कामांसाठी मंजूर केले होते. सदरच्या कामांची निविदा प्रक्रिया कार्यकारी अभियंता तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी द. यी. दामा यांनी पूर्ण करून घेतलेली होती. सदरच्या कामांच्या निविदा अनेक ठेकेदारांनी दि. 12/07/2024 ते 26/07/2024 पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये दिलेल्या आहेत. सदरच्या निविदा उघडण्याचा दि. 29/07/2024 दिवस होता. कितीतरी महिने लोटून गेले तरी निविदा ओपन केलेल्या नव्हत्या. काही दिवसांपूर्वी निविदा ओपन केलेल्या आहेत. त्यामध्ये अनियमितता झालेली आहे. नियमाप्रमाणे टेंडर ओपनिंग झालेले नाही. काही ठेकेदारांकडून पत्र घेतले आहे. ठेकेदारांनी जर पत्र दिले असतील तर त्यांना काळ्या यादीत टाकायला हवे. अशी ठेकेदारांमधून सुद्धा चर्चा सुरू आहे.

माळशिरस तालुक्यातील 42 कामांमध्ये –
१) सिमेंट नाला बंधारा भांबुर्डी (सरस्वती वाघमोडे शेत) ता. माळशिरस ३५.५१ लाख रु., २) सिमेंट नाला बंधारा मांडवे, (दामोदर दादा पालवे शेत) ता. माळशिरस २९.१९ लाख रू., ३) सिमेंट नाला बंधारा मांडवे (दत्तू यशवंत पालवे शेत) ता. माळशिरस २८.९८ लाख रू., ४) सिमेंट नाला बंधारा मांडवे (गायरान) ता. माळशिरस ३९.३० लाख रु. ५) सिमेंट नाला बंधारा मांडवे (जगन्नाथ भालचंद्र कुलकर्णी शेत) ता. माळशिरस ३२.४७ लाख रु., ६) सिमेंट नाला बंधारा मांडवे (पालखीतळ) ता. माळशिरस ३५.९० लाख रु., ७) सिमेंट नाला बंधारा मांडवे (राहुल शिवाजी रुपनवर शेत) ता. माळशिरस ३२.२३ लाख रु., ८) सिमेंट नाला बंधारा मांडवे (शिवाजी ढोबळे शेत) ता. माळशिरस ३९.०१ लाख रु., ९) सिमेंट नाला बंधारा येळीव (स्मशानभूमी जवळ) ता. माळशिरस ३०.८३ लाख रु., १०) सिमेंट नाला बंधारा देशमुखवाडी क्र. १ (भगत शेत पुलाजवळ) ता. माळशिरस २७.६० लाख रु., ११) सिमेंट नाला बंधारा देशमुखवाडी क्र. २ (भगत शेत) ता. माळशिरस ३०.५१ लाख रु., १२) सिमेंट नाला बंधारा देशमुखवाडी क्र. ३ (दादासो खांडे शेत) ता. माळशिरस ४०.५६ लाख रु. १३) सिमेंट नाला बंधारा देशमुखवाडी क्र. ४ (सुरेश महादेव धुमाळ शेत) ता. माळशिरस २१.७७ लाख रु., १४) सिमेंट नाला बंधारा देशमुखवाडी क्र. ५ (पुलाजवळ) ता. माळशिरस ३३.६३ लाख रु., १५) सिमेंट नाला बंधारा देशमुखवाडी क्र. ६ (स्मशानभूमी जवळ) ता. माळशिरस ३७.०४ लाख रु., १६) सिमेंट नाला बंधारा देशमुखवाडी क्र. ७ (निकम शेत) ता. माळशिरस ३६.९८ लाख रू., १७) सिमेंट नाला बंधारा जाधववाडी क्र. १ (रामचंद्र जाधव शेत) ता. माळशिरस ४५.७७ लाख रु., १८) सिमेंट नाला बंधारा जाधववाडी क्र. २ (विजय दोशी शेत) ता. माळशिरस ४५.७७ लाख रु. १९) सिमेंट नाला बंधारा जाधववाडी क्र. ३ (जगन्नाथ वाघमोडे शेत) ता. माळशिरस ४०.११ लाख रु., २०) सिमेंट नाला बंधारा खुडूस क्र. १ (तात्यासाहेब ठवरे शेत) ता. माळशिरस १०.७८ लाख रु., २१) सिमेंट नाला बंधारा खुडूस क्र. २ (मधुकर शिवाजी काळे शेत) ता. माळशिरस १०.७८ लाख रु., २२) सिमेंट नाला बंधारा खुडूस क्र. ३ (मारुती श्रीपती कुलाळ शेत) ता. माळशिरस १०.७८ लाख रु. २३) सिमेंट नाला बंधारा खुडूस क्र. ४ (पानीव रोड कपणे/काळे शेत) ता. माळशिरस १०.७५ लाख रु. २४) सिमेंट नाला बंधारा मारकडवाडी क्र. १ (पाणीपुरवठा विहिरीजवळ) ता. माळशिरस ४५.०९ लाख रु., २५) सिमेंट नाला बंधारा मारकडवाडी क्र. २ (उत्तम मारकड शेत) ता. माळशिरस ४५.०९ लाख रु. २६) सिमेंट नाला बंधारा शिंदेवाडी क्र. १ (स्मशानभूमी जवळ) ता. माळशिरस ३३.६० लाख रु., २७) सिमेंट नाला बंधारा शिंदेवाडी क्र. २ ता. माळशिरस ३०.२३ लाख रु., २८) सिमेंट नाला बंधारा झिंजेवस्ती (मुलाणी वस्ती) ता. माळशिरस २९.१४ लाख रु., २९) सिमेंट नाला बंधारात कळंबोली क्र. १ ता. माळशिरस १८.१९ लाख रु. ३०) सिमेंट नाला बंधारा मेडद (जगताप शेत) ता. माळशिरस २५.५८ लाख रु., ३१) सिमेंट नाला बंधारा मेडद (ननवरे वस्ती) ता. माळशिरस २५.६१ लाख रु., ३२) सिमेंट नाला बंधारा मोटेवाडी (फोंडशिरस) क्र. ३ ता. माळशिरस २५.५८ लाख रु., ३३) सिमेंट नालाबंधारा विठ्ठलवाडी (स्मशानभूमी जवळ) ता. माळशिरस १७.५४ लाख रु. ३४) सिमेंट नाला बंधारा मोटेवाडी (फोंडशिरस) क्र. २ ता. माळशिरस २६.५३ लाख रु., ३५) सिमेंट नाला बंधारा एकशिव क्र. २ ता. माळशिरस २३.८८ लाख रु., ३६) सिमेंट नाला बंधारा प्रतापनगर क्र. १ (भंडालकर-जाधव शेत) ता. माळशिरस २२.०० लाख रु., ३७) सिमेंट नालाबंधारा तिरवंडी क्र. ४ (लक्ष्मण माने-माणिक वाघ) ता. माळशिरस ३१.१५ लाख रु. ३८) सिमेंट नालाबंधारा तिरवंडी क्र. १ (शांता रुपनवर-पांडुरंग वाघमोडे) ता. माळशिरस ३१.१५ लाख रु., ३९) सिमेंट नालाबंधारा प्रताप नगर क्र. २ (भंडालकर-बनकर शेत) ता. माळशिरस २२.०० लाख रु., ४०) सिमेंट नाला बंधारा कचरेवाडी क्र. १ (सरगर-धायगुडे) ता. माळशिरस १३.२२ लाख रु., ४१) सिमेंट नाला बंधारा तिरवंडी क्र. ५ (भंडालकर शेत) ता. माळशिरस ३१.१५ लाख रु., ४२) सिमेंट नाला बंधारा फळवणी क्र. १ (महाविद्यालयाजवळ) ता. माळशिरस २९.५४ लाख रु. अशी कामे आहेत.

सदरच्या कामांमध्ये अनेक ठेकेदारांनी निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. माळशिरस तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी राज्य शासनाने सदरची कामे मंजूर करून घेतलेली आहेत. ठेकेदारांनी सदरची कामे योग्य पद्धतीने व अंदाजपत्रकानुसार करणे गरजेचे आहे. टेंडर प्रोसेस मॅनेज होता कामा नये, यासाठी प्रत्येक गावातील स्थानिक कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांनी जागरूक राहून सदरची कामे अंदाजपत्रकाप्रमाणे करून घेण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे. नाही तर पाण्यासाठी आलेला पैसा ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने कुठे मुरवून घेतील, हे सांगता येणार नाही. यासाठी स्थानिक कार्यकर्ते यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. निविदा प्रक्रियेत झालेल्या गोलमालामध्ये देवाभाऊ यांनी लक्ष घालावे, अशी माळशिरस तालुक्यातील जनतेची मागणी आहे. नाहीतर “बोलाचाच भात अन् बोलाचीच कडी “अशी दुष्काळी जनतेवर म्हणण्याची वेळ येऊ नये याची खबरदारी महायुतीच्या सरकारने घ्यावी.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button