अंकोली येथील शालन मस्के यांचे दु:खद निधन
अंकोली (बारामती झटका) दशरथ रणदिवे यांजकडून
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील रहिवासी शालन महेंद्र मस्के यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी रात्री निधन झाले. मृत्यू समयी त्या ७२ वर्ष वयाच्या होत्या. सारथी विद्यालय खराडी (पुणे) या शाळेचे शिक्षक संजय मस्के यांच्या त्या मातोश्री होत्या.
त्यांच्या पक्षात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सोलापूर येथील कोयनानगर स्मशानभूमी येथे मंगळवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
परमेश्वर स्व. शालन मस्के यांच्या आत्म्याला शांती देवो आणि मस्के परिवाराला या दु:खातून सावरण्याचे बळ देवो, हीच बारामती झटक परिवार यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.