लोकप्रिय तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे – बी. टी. शिवशरण ज्येष्ठ पत्रकार
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील एक समंजस कार्यकर्ता लोकप्रिय तालुका अध्यक्ष तसेच सर्वसामान्यांना आपला पुर्ण वेळ देणारे बहुआयामी रिपब्लिकन कार्यकर्ते म्हणून मिलिंद सरतापे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट माळशिरस तालुक्यात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या काही मोजक्या कार्यकर्त्यांत मिलिंद सरतापे हे नाव आघाडीवर आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे विचार, भुमिका याला प्रमाण मानून पक्षाची भूमिका, धोरण, न्याय प्रणाली याचा प्रसार व प्रचार करत असताना पक्ष वाढीसाठी मिलिंद सरतापे यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.
सर्वसामान्य कार्यकर्ता रामदास आठवले यांचे नेतृत्वाखाली पक्षात कसा आणता येईल, सामाजिक राजकीय कार्यासाठी मिटिंग, आंदोलन, निवेदन याचा पाठपुरावा करून सर्वसामान्यांचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते तत्पर व दक्ष असतात. अतिशय विनम्र स्वभाव, प्रांजळ भुमिका यामुळे ते केवळ रिपब्लिकन पार्टी मध्येच सक्रिय व कार्यरत आहेत, अशातला भाग नाही तर सर्व संघटना, राजकीय पक्ष. गावगाडा. स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये त्यांचा वावर असतो. विकासात्मक कामे, प्रशासन यांच्यातील ते महत्वाचा दुवा राहिले आहेत.
मिलिंद सरतापे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकत असताना काही ठळक व उल्लेखनीय बाबींवर लक्ष वेधलं पाहिजे. प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे ते निस्सीम चाहते, कट्टर समर्थक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट माळशिरस तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले आहे. दरमहा पक्षाच्या बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद, गाव तेथे पक्षाची शाखा, शाखा फलक अनावरण आढावा हे उपक्रम सोलापूर जिल्ह्यात फक्त माळशिरस तालुक्यात मिलिंद सरतापे यांचे अध्यक्षतेखाली होत असावे. या त्यांच्या सुनियोजित व शिस्तबद्ध कामकाजासंदर्भात प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी मिलिंद सरतापे यांचे कौतुक करुन त्यांना शाबासकी दिली आहे.
मिलिंद सरतापे यांनी पक्षाला पुर्ण वेळ दिला आहे. माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सामिल असणारा एकमेव लोकप्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. युवा कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, समाज, पक्ष यांचा समन्वय साधून पक्षाचे काम अविरतपणे चालू ठेवणं सहज व सोपे नाही. पण, आपल्या अंगभूत बुध्दी कौशल्याने त्यांनी करून दाखवले आहे. पंधरा जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना अंतःकरण पुर्वक शुभेच्छा देतो व त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना पक्ष चळवळ व सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा नवचैतन्य उमेद व नाविन्याची ओढ कायम लागो या सदिच्छा व्यक्त करतो.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.