माळशिरस तालुक्यात कागदोपत्री खडी क्रेशर बंद मात्र, अनाधिकृत बेकायदेशीर धुरळा उडवत सुरू…..
माळशिरस तालुक्यासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय असून महसूल विभागात मंडल अधिकारी व तलाठी यांची डोळेझाक का ?
माळशिरस (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालय व तहसील कार्यालय आहे. सदरच्या ठिकाणी सर्वच्या सर्व जागा भरलेल्या आहेत. मंडल अधिकारी व तलाठी यांच्या सुद्धा नेमणुका आहेत. तरीसुद्धा, अनाधिकृत व बेकायदेशीर खडी क्रेशर सुरू आहेत, याकडे डोळे झाक का ?, असा सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे. माळशिरस तालुक्यातील अनाधिकृत खडी क्रेशरची माहिती तहसील कार्यालयाकडून मिळालेली आहे. माळशिरस तालुक्यात कागदोपत्री खडी क्रेशर बंद मात्र, अनाधिकृत बेकायदेशीर धुरळा उडवत खडी क्रेशर धुमधडाक्यात सुरू आहे. यामध्ये आर्थिक साठे लोटे मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता असल्याने राजरोसपणे रात्रंदिवस अनाधिकृत बेकायदेशीर खडी क्रेशर सुरू आहेत.
माळशिरस तालुक्यातील अनाधिकृत खडी क्रेशरमध्ये माळशिरस हद्दीत 3 तिरवंडी, 1 कचरेवाडी, 6 मोटेवाडी, 1 वेळापूर, 3 नातेपुते, 1 पिंपरी, 1 मेडद, 1 जळभावी, 1 दहिगाव, 1 पुरंदावडे, 1 मांडवे, 3 येळीव, 1 गिरझणी, 1 कोंडवावी असे 25 अनधिकृत खडी क्रेशरची यादी गट क्रमांकासह तहसील कार्यालयाकडून मिळालेली आहे. तहसील कार्यालयाकडे नोंद नसणारे किती खडी क्रेशर असतील, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचीही जाणीवपूर्वक डोळेझाक होत आहे का ? आर्थिक महसूल जमा झालेला पोहोच होत आहे का ? असाही प्रश्न समाज माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
तलाठी मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांना अनाधिकृत व बेकायदेशीर खडी क्रेशर कडे लक्ष देण्यास वेळ नाही. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या बेकायदेशीर गोष्टीकडे लक्ष देतील का ? अशीही बेकायदेशीर व अनाधिकृत खडी क्रेशर सुरू असल्याने सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होत असल्याने त्रस्त व संतप्त जनतेमधून उलट सुलट चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.