लोकप्रिय दमदार राम सातपुते यांच्या भाजप सदस्य नोंदणीच्या आवाहनाने कार्यकर्त्यांनी नोंदणीचा धुमाकूळ घातला आहे….

माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचे सदस्यता अभियान वास्तवात आले आहे…
भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुक्यातील निष्ठावान व गद्दारसुद्धा लागले कामाला….
माळशिरस (बारामती झटका)
केंद्रीय गृहमंत्री व भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी भाई शहा यांच्या नेतृत्वात देशातील आणि जगातील सर्वात मोठी पार्टी म्हणून नावारूपाला आलेल्या भारतीय जनता पार्टीचे सभासद नोंदणी अभियान सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून माळशिरस तालुक्यात सभासद नोंदणी कॅम्प सुरू केलेला आहे. देशातील आणि जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सदस्य होऊन आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे भारत देशाला विश्वगुरू बनवण्याचे स्वप्न साकार करण्यास भारतीय जनता पक्षाचे सदस्य होऊन आपण भारतीय जनता पक्षासोबत आहात, हे अधिकृतरित्या जाहीर करावे, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी मधुर मिलन मंगल कार्यालय येथे सदस्यता अभियानात कार्यकर्त्यांना केलेले होते. माळशिरस तालुक्यात कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणीचा धुमाकूळ घातलेला असून एकमेकांची सदस्य करण्यासाठी चढाओढ लागलेली आहे. त्यामध्ये भाजपचे निष्ठावान व गद्दारसुद्धा कामाला लागले. माळशिरस तालुक्यात भाजप सदस्य नोंदणीची मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू झालेली आहे.


मधुर मिलन मंगल कार्यालय, नातेपुते येथे भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत व सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका सदस्यता अभियान प्रमुख कार्यकर्ता बैठक शुक्रवार दि. 10 जानेवारी 2025 रोजी संपन्न झालेली होती. यावेळी प्रमुख कार्यकर्ता बैठकीचे नेटके नियोजन केले होते. मुख्य प्रवेशद्वारावर कमान उभारून कार्यक्रम स्थळाच्या अहवालापर्यंत दुतर्फा झेंडे उभारलेले होते. कार्यकर्त्यांच्या नोंदी घेऊन त्यांना ओळखपत्र, पेन, डायरी व पिशवी दिली जात होती. भव्य स्टेजवर प्रमुख मान्यवर व समोर खुर्च्यांवर कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केलेली होती.


सदरच्या बैठकीमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना लोकप्रिय दमदार राम सातपुते म्हणाले की, प्रस्थापितांचे धोरण व सरंजामशाही हे सर्व मातीत मिळवण्यासाठी राम सातपुते शांत बसणार नाही. निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून गद्दारांना त्यांची जागा दाखवणार असल्याचे सांगून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे सदस्य नोंदणी करावी.

माळशिरस तालुक्यातून 71 सदस्य नोंदणीचा संकल्प केलेला होता. महाराष्ट्रात सर्वत्र भाजप सदस्यता नोंदणी विशेष अभियान पक्षाकडून राबविण्यात येणार आहे. माळशिरस तालुका अग्रेसर दिसला पाहिजे, यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख यांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून घ्यावी. आपल्याला राज्यात एक नंबरची सदस्य नोंदणी माळशिरस तालुक्यातून करावयाची आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
माळशिरस तालुक्यात जो भाजपचा कार्यकर्ता स्वतःच्या नावावर पंधराशे सदस्यता करणार त्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेबांसोबत भेटणार, असे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन केलेले असल्याने भाजपचे कार्यकर्ते माळशिरस तालुक्यात हुकूमशाहीला न जुमानता भाजपा प्रमुख कार्यकर्ता बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते. प्रत्येक कार्यकर्त्यांनी अडीचशे सदस्यता नोंदणी करायची, अशी सर्वांनी मनाशी खुणघाट बांधून कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.