सुसंस्कृत, सोज्वळ, संस्कारक्षम व आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या तात्यांना अमृत महोत्सवी निमित्त शुभेच्छा देण्याचा योगायोग….
सदाशिवनगर (बारामती झटका)
सदाशिवनगर ता. माळशिरस, येथील सुसंस्कृत, सोज्वळ, संस्कारक्षम व आदर्श व्यक्तिमत्व असणारे श्री. पांडुरंग बाबा राऊत उर्फ तात्या यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. सुभाष सुज्ञे उर्फ हरी ओम यांच्यामुळे बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना तात्यांना अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा देण्याचा योगायोग आला.
मुळगाव पुरंदावडे येथील बाबा राऊत व सुभद्रा राऊत यांना पाच मुले व दोन मुली असा परिवार होता. त्यामधील पांडुरंग राऊत उर्फ तात्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शाळेत जाऊ शकले नाहीत. पहिली शाळा झालेल्या तात्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याकरता 1972 साली टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला.
तात्यांना बेबीताई धर्मपत्नी लाभलेल्या आहेत. लक्ष्मी-नारायणाचा जोडा असावा, अशा पद्धतीने कष्ट करून या दांपत्यांनी आपली मुले शिक्षित केली. तात्यांना प्रतिकूल परिस्थिती असल्याने शिक्षण घेता आलं नाही मात्र, आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन आदर्श संस्कार दिलेले आहेत. तात्यांना दिनेश व ज्ञानेश अशी दोन मुले. मुलांनीही आपल्या वडिलांच्या कष्टाचे चीज करून दिनेश राऊत यांनी बीई इंजीनियरिंग पूर्ण केले तर ज्ञानेश यांनी एम. ए. पूर्ण केलेले आहे. दिनेश सध्या बारामती येथे कंपनीमध्ये नोकरीस आहेत. त्यांना अकलूज येथील गिरमे घराण्यातील वनिता धर्मपत्नी लाभलेल्या आहेत. त्यांना जय व दिव्या अशी दोन अपत्य आहेत. तर ज्ञानेश राऊत सध्या रत्नत्रय पतसंस्था सदाशिवनगर येथे मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. त्यांना महाळुंग येथील शिंदे परिवारातील सारिका धर्मपत्नी लाभलेल्या आहेत. त्यांना श्रीयश व श्रद्धा अशी दोन अपत्य आहेत.
सध्या सदाशिवनगर येथे राऊत परिवार वास्तव्यास आहेत. पांडुरंग राऊत उर्फ तात्या यांना 75 वर्ष पूर्ण होत असल्याने अमृत महोत्सवी कार्यक्रम राम-लक्ष्मणासारख्या असणाऱ्या बंधूंनी ठेवलेला होता. सदरच्या कार्यक्रमासाठी तात्यांची व दोन मुलांचे मित्रपरिवार, नातेवाईक, पुरंदावडे व सदाशिवनगर गावातील ग्रामस्थ यांना अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त आमंत्रित केलेले होते. निमंत्रणावरून सदाशिवनगर पंचक्रोशीमध्ये सोज्वळ व्यक्तिमत्व असणारे श्री. सुभाष सुज्ञे उर्फ हरी ओम व बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना अमृत महोत्सवी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योगायोग आला. तात्यांचा अमृत महोत्सवानिमित्त पहिल्यांदा सन्मान करण्याचा मान मिळाला. तात्यांनी स्वतः खांद्यावर हात टाकून श्रीनिवास कदम पाटील यांना सुद्धा वयाचा विचार न करता खांद्यावर हात टाकण्याची विनंती केली. खरंच, तात्यांचं अमृत महोत्सवी वर्ष असलं तरी सुद्धा त्यांच्यामधील मैत्रीचं नातं दिसून आलं. अशा सुसंस्कृत, सोज्वळ, संस्कारक्षम व आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या तात्यांना अमृत महोत्सवानिमित्त त्यांना आरोग्य लाभो व त्यांच्या शतक महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योगायोग येवो, अशा पद्धतीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.