‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठी टेंभुर्णी येथे निवड चाचणी
सोलापूर शहर व जिल्हा यांची संयुक्त निवड चाचणीला टेंभुर्णी येथे आजपासून सुरुवात
टेंभुर्णी (बारामती झटका)
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर शहर कुस्तीगीर संघ व सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघ यांची संयुक्त निवड चाचणी स्पर्धा आज दि. १७ व १८ जानेवारी रोजी टेंभुर्णी (ता. माढा) घेण्यात येणार आहे. टेंभुर्णी येथील कुर्डुवाडी रोडवर ब्रिजच्या नजीक ही निवड चाचणी कुस्ती स्पर्धा होणार असल्याचे सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान अस्लम काझी यांनी सांगितले.
दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी लोणीकंद, पुणे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती, या सभेत वरील निर्णय घेण्यात आला आहे. या चाचणी स्पर्धेतून निवडलेले २ कुस्ती संघ अहिल्यानगर येथे होत असलेल्या वरिष्ठ अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहेत. तसेच मागील वर्षी फुलगाव येथे झालेल्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सांधिक विजेतेपद मिळाले असल्याने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघाचा अधिकचा १ कुस्ती संघ वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी पाठवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या निवड चाचणीमध्ये एकूण ३ संघ निवडले जाणार आहेत.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील जास्तीत जास्त पैलवानांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सोलापूर जिल्हा व सोलापूर शहर कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ महाडिक, पैलवान नागनाथ खटके पाटील यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.