पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप सदस्य नोंदणीचे अभियान यशस्वी करावे – चेतनसिंह केदार सावंत
सांगोल्यात भाजप सदस्य मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगोला (बारामती झटका)
आगामी दोन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून कामास लागण्याची गरज आहे. सक्षम कार्यकर्ता हीच भाजपची खरी ताकद असल्याने आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप सदस्य नोंदणीचे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष तथा सदस्य नोंदणी अभियानचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली असून प्रत्येक कार्यकर्ता या अभियानात सहभागी झाला आहे. सदस्यता नोंदणी अभियानाच्या धर्तीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यासह जिल्ह्यात महासदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भाजप सदस्य नोंदणीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गावपातळीवरील बुथ कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षाचा आधारस्तंभ आहे. बुथप्रमुखापासून तालुका, जिल्हा तसेच प्रदेश व राष्टीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळेच भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. सक्षम भाजपा, समृद्ध भाजपा, आगामी काळात शत प्रतिशत भाजपा हा उद्देश सफल करण्यासाठी या अभियानाची व्याप्ती आवश्यक आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हे अभियान लाभदायक ठरणार असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी राबविलेल्या योजना सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचविल्या पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दहा वर्षातील क्रांतीकारी कार्य जनतेसमोर न्यायचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मजबूत करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप सदस्यता मोहीम प्रभावीपणे राबवणे गरजेचे असून सक्षम कार्यकर्ता हीच भाजपची खरी ताकद असल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबात भाजपचा सदस्य असणार – चेतनसिंह केदार सावंत
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती भारतीय जनता पार्टीचा सदस्य असेल, यासाठी सदस्य नोंदणीसाठी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य करण्याचा निर्धार असून शहरातील, गावातील प्रत्येक घराघरात भाजपचे कार्यकर्ते पोहोचले असून सदस्य नोंदणीसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत हे स्वतः प्रत्येक घरोघरी, प्रत्येक दुकानात जावून सदस्य नोंदणीसाठी नागरिकांना आवाहन करीत असल्याने भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.