ताज्या बातम्याराजकारण

शरदचंद्र पवार यांना वाय सुरक्षा तर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना वाय प्लस सुरक्षा….

माळशिरस (बारामती झटका)

देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांना वाय सुरक्षा आहे तर माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असल्याने राजकारणात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा राजकीय वर्तुळात चढता आलेख आपणांस पहावयास मिळत आहे.

सातारा जिल्ह्याचे भगिरथ माजी खासदार स्वर्गीय लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या विचारांचा वसा व वारसा जपत राजकारणात वरिष्ठ नेत्यांची निष्ठा व विश्वास संपादन केलेले माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी स्वकर्तुत्वावर राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय आजी-माजी मंत्री यांच्या सहकार्याने व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे विद्यमान अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम माजी मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या सहकार्याने लोकनेते स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पाहिलेले सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे स्वप्न निरा-देवधर पाण्याचा रखडलेला प्रश्न व लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेचा प्रलंबित प्रश्न यांसह सातारा जिल्ह्यातील अनेक विकासकामांचा पाठपुरावा रणजीतसिंह नाईक निंबाळकर करीत आहेत.
निरा-देवधर प्रकल्पातील फलटण आणि माळशिरस तालुक्याचे पाणी बारामतीला वळवून फलटणकर व अकलूजकर यांनी नेत्यांचा आशीर्वाद व शेतकरी जनतेचा तळतळाट घेऊन राजकारण केलेले होते.

माढा लोकसभेचे खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा विजयाचा अंगावरील गुलाल झटकून बारामतीला बेकायदेशीर जाणारे पाणी हक्कांच्या तालुक्याला दिलेले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्राला वेगळे महत्त्व आहे. भारतीय जनता पक्षाला मराठा व आक्रमक चेहरा म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे केंद्रीय व महाराष्ट्रातील नेतृत्व पाहत आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये माढा लोकसभा मतदार संघात सिंचनाच्या रखडलेल्या योजनांना चालना देऊन महामार्ग, रस्ते यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले होते. त्यांच्या कार्याला अनेक केंद्रीय मंत्र्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भेटी देऊन अनेक प्रश्न निकाली काढलेले होते.

मूलभूत प्रश्नांची जाण ठेवून आक्रमक भाषेवर प्रभुत्व, कार्यामध्ये कर्तुत्व असणारे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षामध्ये मानाचे स्थान दिले जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्या पन्नास उमेदवारीमध्ये रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झालेली होती. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे राजकीय वर्चस्व वाढत असल्याने फलटणकर व अकलूजकर यांनी महायुतीचा धर्म न पाळता गद्दारी केलेली होती. तरीसुद्धा चांगले मताधिक्य रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळालेले होते. विरोधकांनी देशांमध्ये वेगळा नॅरेटिव्ह तयार केलेला होता. त्यामध्ये संविधान बदलणे, मराठा धनगर आरक्षण, शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमीभाव, महागाई अशा अनेक प्रश्नांमुळे सर्वसामान्य जनतेने लोकसभेला अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव केलेला होता. त्यामध्ये माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा सुद्धा पराभव झालेला होता.

मात्र, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभवाने खचून न जाता मतदार संघातील प्रलंबित असणाऱ्या कामांचा पाठपुरावा सुरूच आहे. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघात विशेष लक्ष देऊन तीस वर्षाची जुलमी सत्ता उलथवून टाकलेली आहे. महायुतीच्या वाटपामध्ये राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाला जागा गेलेली होती. सचिन कांबळे पाटील यांना विजयश्री खेचून आणण्यामध्ये खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सिंहाचा वाटा आहे.

केंद्रीय व राज्यातील नेतृत्वाने खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखविलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात मराठा आक्रमक चेहरा व गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण असणारा नेता म्हणून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीचे सरकार स्थापन होत असताना अनेकांचे योगदान झालेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री यांची वर्णी न करता रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यामध्ये रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा सिंहाचा वाटा आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रस्थापितांची वाट लावण्याकरता पालकमंत्री जयकुमार गोरे यांना संधी दिलेली आहे. केंद्रातील व राज्यातील नेते मंडळी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत. वाय प्लस सुरक्षा देऊन केलेल्या कार्यकर्तुत्वाचा सन्मानच आहे. दौऱ्याच्या वेळी संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी गाडी घेऊन हजर असतात, सोबत कॅनव्हा कमांडर, बॉडीगार्ड अशी फौज घेऊन रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे महाराष्ट्रात विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढीचे काम जोमाने सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button