श्री चंद्रशेखर विद्यालय प्राथमिक शाळा, श्रीपूर येथील कब बुलबुल विद्यार्थ्यांची राष्ट्रीय सुवर्णबाण पुरस्कार नवी दिल्लीसाठी निवड !
श्रीपूर (बारामती झटका)
श्रीपूर ता. माळशिरस, येथील श्री चंद्रशेखर विद्यालय प्राथमिक विभागातील सहा कब स्काऊट विद्यार्थी आणि सहा बुलबुल गाईड विद्यार्थिनींची द भारत स्काऊटस् आणि गाईडस् राष्ट्रीय मुख्यालय, नवी दिल्ली द्वारा आयोजित राष्ट्रीय सुवर्ण बाण पुरस्कार नवी दिल्ली-२०२५ यासाठी निवड झाली असून येत्या २२ फेब्रुवारी २०२५ रोजी स्काऊट गाईड चळवळीचे आद्य संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांचे जन्मदिनी १० वर्षाच्या आतील स्काऊटींगमधील या सर्वोच्च राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने शाळेच्या विद्यार्थ्यांना नॅशनल युथ कॉम्प्लेक्स गदपुरी जिल्हा पलवल, हरियाणा राज्य येथील राष्ट्रीय कार्यक्रमात नॅशनल प्रेसिडेंट डॉ. अनिल कुमार जैन आणि राष्ट्रीय मुख्य आयुक्त डॉ. के. के. खंडेलवाल (आय.ए.एस.) यांचे शुभ हस्ते राष्ट्रीय सुवर्ण बाण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या शाळेने २० वर्षांची राष्ट्रीय सुवर्णबाण पुरस्काराची परंपरा कायम राखत यावर्षी मिथिलेश गणेश कुलकर्णी, जयदीप सुभाष पवार, श्रेयश लक्ष्मण पवार, शंभूराजे सचिन मांगले, आयुष नागनाथ जाधव आणि पवन गणेश कुलकर्णी हे सहा कब विद्यार्थी व कु. ईश्वरी महादेव मुंडफणे, कु. स्वरा संजय सुरवसे, कु. अन्वी महेंद्र लोंढे, कु. सिद्धी विठ्ठल गमे, कु. प्रांजल दत्तात्रय घुले आणि कु. शिवन्या शंकर वाघमारे या सहा बुलबुल विद्यार्थिनींनी जिल्हा स्तरावरील परीक्षेमध्ये यश मिळवून राज्यस्तरावरील परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवत चतुर्थ चरण राज्य पुरस्कार व हीरक पंख राज्य पुरस्कार प्राप्त केले होते. त्यासाठी राज्यस्तरावर तीन दिवस लेखी, तोंडी व विविध प्रात्यक्षिक परीक्षा दिल्या होत्या. त्यामध्ये यशस्वी होऊन राज्य मुख्य आयुक्त यांच्या सहीचे प्रमाणपत्र मिळवून त्यांचे फॉर्म राष्ट्रीय मुख्यालय नवी दिल्ली येथे पाठवण्यात आले होते. तेथे फॉर्मचे छाननी होऊन कब-बुलबुल विद्यार्थी जीवनातील दहा वर्षाच्या आतील राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रीय सुवर्णबाण पुरस्कार नवी दिल्ली २०२५ यासाठी वरील १२ विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या वर्षी याच शाळेच्या पाच कब विद्यार्थी व चार बुलबुल विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत राष्ट्रीय सुवर्ण बाण हा पुरस्कार स्वीकारला होता. या यशस्वी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य लीडर ट्रेनर कब तथा सोलापूर जिल्ह्याचे ट्रेनिंग कमिशनर शंकरराव यादव आणि फ्लॉकलीडर कु. करुणा धाईंजे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा मुख्य आयुक्त तथा जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख साहेब, जिल्हा चिटणीस तथा उपशिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती स्वाती हवेले, जिल्हा संघटक स्काऊट श्रीधर मोरे, जिल्हा संघटक गाईड अनुसया शिरसाट, आबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामदासजी देशमुख, उपाध्यक्षा सौ. शुभांगी ताई देशमुख, सचिव भारत कारंडे, संस्थेचे संचालक यशराज भैय्या देशमुख, गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुमार करडे, केंद्रप्रमुख भक्ती नाचणे, मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी यशस्वी कब बुलबुल व मार्गदर्शक स्काऊटर शंकरराव यादव व गाईडर करुणा धाईंजे यांचे अभिनंदन केले व पुरस्कार वितरण समारंभासाठी शुभेच्छा दिल्या!
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.