अनेक वर्ष अंधारात असलेले भांबुर्डी गाव युवा नेते विष्णुपंत वाघमोडे मित्रपरिवार यांच्या अथक प्रयत्नाने उजेडात आले…
भांबुर्डी गाव अंतर्गत पाच गावठाण डीपींचे काम पूर्ण, तर तीन प्रगतीपथावर उजेडात आलेल्या जनतेकडून समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
भांबुर्डी (बारामती झटका)
महावितरण कंपनीच्या एनएसटी योजनेअंतर्गत भांबुर्डी ता. माळशिरस, या गावातील २५ वर्षापासून प्रलंबित असणारा गावठाण डीपीचा प्रश्न भांबुर्डी गावचे कार्यक्षम माजी ग्रामपंचायत सदस्य युवा नेते विष्णुपंत वाघमोडे मित्रपरिवार यांनी अनेक वर्ष अंधारात असलेले भांबुर्डी गाव युवा नेते विष्णुपंत वाघमोडे मित्रपरिवार यांच्या अथक प्रयत्नाने उजेडात आलेले आहे. यामध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत वाघमोडे, महेश खंडागळे, सुखदेव नरळे, संतोष शिवाजी गारूळे, विष्णू सुतार, किशोर जाधव, आनंद देवकते या तरुणांनी एकत्र येऊन अनेक वर्षापासून स्थानिक नागरिकांची अडचण दूर करून गावठाण डीपीच्या माध्यमातून अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करीत आहेत. भांबुर्डी गावामध्ये विशेष करून पाच नंबर वार्डात खंडागळे वस्ती, खंडोबा वस्ती, दडस वस्ती, ५७ फाटा भांबुर्डी, दत्तनगर भांबुर्डी या पाच ठिकाणी गावठाण डीपीचे काम पूर्ण झालेले आहे. तर बालाजी नगर, नंदीवाले वस्ती, बंडगर नर्सरी जवळ म्हसवड रोड, शत्रुघ्न शेंडगे वस्ती, या तीन ठिकाणचे तीन डीपी मंजूर झालेले असून सदरचे काम प्रगतीपथावर आहे.
अनेक दिवस स्थानिक नागरिकांची अडचण होती. तरुणांनी एकत्र येऊन सदरची अडचण दूर केलेली आहे. वार्ड क्र. ५ मध्ये प्राधान्याने गावठाण डीपीचा प्रश्न सोडवलेला आहे. भांबुर्डी गावामध्ये आवश्यक असलेल्या अनेक ठिकाणी काम करणार आहे. गावातील सर्व जनतेने सेवा करण्याची संधी द्यावी, अशी भांबुर्डी ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष माजी सदस्य युवा नेते विष्णुपंत वाघमोडे यांनी बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी संवाद साधताना अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.