विझोरी येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत कलाविष्कार वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन
विझोरी (बारामती झटका)
विझोरी, ता. माळशिरस येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, विजयनगर, विझोरी येथील विद्यार्थ्यांचा कलाविष्कार वार्षिक स्नेहसंमेलन कलाविष्कार – २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि. ६/२/२०२५ रोजी सायंकाळी ६ वा. करण्यात आले आहे.
लहान मुलांच्या कलागुणांचे कौतुक सर्वच पालकांना असते. त्यांच्या याच कलागुणांना वाव देण्याचे काम शाळा, शाळेतील शिक्षक करत असतात. त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या अंगातील कलेची जाणीव करून देत ती जोपासत असतात. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने त्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. ही चिमुकले मुलेही त्याचा पुरेपूर उपयोग करून घेत आपली कला सादर करतात.
आपण सादर केलेली कला आपल्या आई वडिलांनी, इतरांनी पहावी, असे या मुलांना वाटत असते. त्यामुळेच आपल्या मुलांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाला आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तरी, या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा विजयनगर, विझोरी व अध्यक्ष/उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती विजयनगर, विझोरी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.