फलटण शहरातील एका नामांकित बँकेत इन्कम टॅक्स व सीबीआयची धाड…
संजीवराजे, रघुनाथराजे यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाचा छापा, बँकेतील संचालक मंडळाच्या घरावर सुद्धा धाड पडण्याची शक्यता…
कोट्यावधी रुपयांचा बेकायदेशीर व्यवहार, तीन-चार वर्षांपूर्वी रिझर्व बँकेने लावले होते निर्बंध..
फलटण (बारामती झटका)
सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकला आहे. फलटणसह पुणे व मुंबई येथील घरांवर सुद्धा छापेमारी झाल्याची माहिती मिळत आहे. फलटण शहरातील एका नामांकित बँकेत इन्कम टॅक्स व सीबीआयची धाड पडली असून सदर बँकेतील संचालक मंडळाच्या घरावर सुद्धा धाड पडण्याची शक्यता आहे. कोट्यावधी रुपयांच्या बेकायदेशीर व्यवहारवर तीन-चार वर्षांपूर्वी रिझर्व बँकेने निर्बंध लावले होते.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू होत्या. बैठकाही झालेल्या होत्या. काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला आहे. आयकर विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. सकाळी सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नाही, अशी माहिती आहे.
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमाणेच रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरीही केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. हे दोघेही रामराजे यांचे चुलत बंधू आहेत. सकाळी सहा वाजता केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी छापा टाकण्यासाठी दाखल झाले आहेत. या विषयीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे आधीपासूनच शरद पवार यांच्या पक्षात आहेत तर संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.
संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशापूर्वी मोठी घडामोड झाली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे येत्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यापूर्वीच हा छापा टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साताऱ्यातील राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्याशी चर्चेनंतर प्रवेशाचा निर्णय होईल असं म्हटलं होतं. इन्कम टॅक्स व सीबीआयची धाड पडल्याने सातारा जिल्ह्यात छापा पडलेला आहे मात्र, सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांचे टेन्शन वाढले..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.