मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचा सत्कार
भाजप सदस्य नोंदणीत सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर
सांगोला (बारामती झटका)
राज्यभरात सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट घेऊन भाजपकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली संघटन पर्व अंतर्गत सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात भाजप पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने सदस्य नोंदणीसाठी महत्त्वाचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप संघटन पर्व अंतर्गत सदस्य नोंदणी अभियानात सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात २ लाख ११ हजार ४७३ (६२.७५) सदस्य नोंदणी करीत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात महायुतीचा एकही आमदार नसताना सदस्य नोंदणीत उल्लेखनीय कामगिरी केल्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचा सत्कार केला.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसह महायुतीला यश मिळाल्यानंतर भाजप सदस्य नोंदणीला गती आली आहे. सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात ३ लाख ३७ हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवून उतरलेल्या भाजपने जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली जवळपास २ लाख ११ हजार ४७३ इतक्या सदस्य नोंदणीपर्यंत मजल मारत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. भाजप सदस्य नोंदणीला १ जानेवारीपासून सुरुवात झाली असून भाजपला वाढता प्रतिसाद पाहता भाजप सदस्य नोंदणीची तारीख १८ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे. भाजपच्या राजकीय बेरजेनुसार प्रत्येक बूथवर किमान २०० भाजप सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले होते.
सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत पक्षस्तरावर प्रचंड काम करताना दिसत आहेत. जिल्ह्यात सदस्य नोंदणीची संख्या पक्ष वाढीसाठी महत्त्वाची आहे. वाड्या-वस्त्यांवर जाऊन भाजप सदस्य नोंदणी करण्याचा प्रयत्न भाजप पदाधिकाऱ्यांचा सुरू आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जिल्ह्यातील गावे, आठवडा बाजार, घरोघरी, वाड्यावस्त्यांवर जावून सदस्य नोंदणी केली आहे. भाजप सदस्य नोंदणीसाठी लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्ते देखील तितकेच उत्साही आहेत. या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून शासकीय योजनेची माहिती त्या सदस्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. केवळ निवडणूक म्हणून नव्हे तर इतर वेळी देखील २४ तास नागरिकांची सेवा होणे या उद्दिष्टाने भाजपचे काम सुरू असल्याचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले. भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून जिल्ह्यातील भाजप सदस्य नोंदणीची संख्या ही ४ लाखापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून १९ फेब्रुवारीपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्या मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी हेच भाजपचे यश असणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
चेतनसिंहाच्या पाठीवर मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप…
सदस्य नोंदणी अभियानात राज्यात तिसरा क्रमांक पटकावल्याबद्दल सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संघटन पर्व महाराष्ट्र प्रभारी व भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, माहिती-तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, महामंत्री आमदार विक्रांत पाटील, महामंत्री राजेश पांडे, महामंत्री माधवी नाईक, महामंत्री विजय चौधरी, महामंत्री संजयजी केनेकर आदी उपस्थित होते.
सदस्य नोंदणीत सर्व श्रेय कार्यकर्त्यांचे – चेतनसिंह केदार सावंत
सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात २ लाख ११ हजार ४७३ सदस्य नोंदणी करून तिसरा क्रमांक पटकावला असून याचे सर्व श्रेय भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आहे. सांगोला, माळशिरस, पंढरपूर, माढा, करमाळा, बार्शी तालुक्यातील भाजपचे आजी – माजी आमदार, प्रदेश कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करत सदस्य नोंदणीची उद्दिष्टपूर्ती केली असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.