नेचर डिलाईट डेअरीच्या कारवाईने खाजगी दूध संघाचे व मालकांचे धाबे दणाणले..
सराटीच्या पुलावरून दूध संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या फोनवरील संभाषणाने संशय बळावला…
अकलूज (बारामती झटका)
नेचर डिलाईट दुग्ध व्यवसायिक अर्जुन देसाई यांच्या डिलाईट डेअरीच्या ठिकाणी व घरावर केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी दाखल होऊन कसून चौकशी सुरू झालेली आहे. अर्जुन देसाई आणि मयूर जामदार यांच्याशी निगडित असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील कळस येथील नेचर डिलाईट डेअरीच्या चौकशीने खाजगी दूध संस्था चालक व मालकांचे धाबे दणाणलेले आहेत. सराटीच्या पुलावर दूध संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा फोन सुरू होता. कोणाशी बोलत होता याची माहिती मिळालेली नाही मात्र, फोनवरील संभाषणाने संशय बळावलेला आहे. आपल्या संघात दूध संकलन कमी होत आहे. प्रोडक्शन व दूध विक्री भरपूर प्रमाणात होत आहे. जर आपल्या संघाची सखोल चौकशी झाली तर अडचण येऊ शकते, असे फोनवरील संभाषण सुरू होते, अशी गोपनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. सदरचा कर्मचारी ओळखीचा नव्हता मात्र, गाडीचे पासिंग एम एच ४५ असे असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण पाठोपाठ पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील काही खाजगी व्यावसायिकांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकल्याची माहिती मिळतेय. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील नेचर डिलाईटचे अर्जुन देसाई यांच्या घरी देखील आज सकाळी पहाटेपासूनच हे अधिकारी दाखल झालेत. मात्र, कोणत्या खात्याचे हे अधिकारी आहेत हे अद्याप समजू शकले नाही. मात्र आयकर विभागाची ही धाड असल्याचा अंदाज लावला जातोय.
देसाई यांच्या घरी सकाळपासूनच केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. यासोबतच देसाई यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. सर्वसामान्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलाय. तर दुसरीकडे देसाई यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या मयूर जामदार यांच्या घरी देखील आज सकाळपासून तपास यंत्रणांचे अधिकारी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
तर अर्जुन देसाई आणि मयूर जामदार यांच्याशी निगडित असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील कळस येथील नेचर डिलाईट डेअरीच्या ठिकाणी देखील केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी सकाळपासूनच पोहचले होते. त्या ठिकाणी देखील कसून चौकशी केली जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार दूध प्रकल्पाशी संबंधित ठिकाणी तपासणी व चौकशी केली जात असल्याची स्थिती असून अशा संदर्भातील तपासाची चर्चा आहेत. इंदापूर तालुक्यातही अशी तपासणी सुरू आहे अशी प्राथमिक माहिती मिळत असून यासंदर्भात अद्याप संबंधित यंत्रणांकडून कोणतेही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, खाजगी दूध संघाच्या मालक व संबंधित भागीदाराची कसून चौकशी सुरू असल्याने खाजगी दूध संघ चालक व मालकांचे धाबे दणाणलेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या फोनच्या संभाषणाने अधिक संशय बळावलेला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.